भाजप कार्यकर्त्यांनी समाजासाठी झटावे

By admin | Published: April 20, 2017 01:30 AM2017-04-20T01:30:25+5:302017-04-20T01:30:25+5:30

विद्या ठाकूर : भाजपतर्फे समरजितसिंह घाटगे यांचा सत्कार समारंभ

BJP activists mobilize for the society | भाजप कार्यकर्त्यांनी समाजासाठी झटावे

भाजप कार्यकर्त्यांनी समाजासाठी झटावे

Next

कोल्हापूर : केंद्र व राज्य सरकारच्या योजना तळागाळात पोहोचवून भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजोन्नतीसाठी झटावे, असे आवाहन महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी बुधवारी येथे केले.
पुणे विभागीय म्हाडाच्या अध्यक्षपदी समरजितसिंह घाटगे यांची निवड झाल्याबद्दल बिंदू चौक येथील भाजप कार्यालयात आयोजित सत्कार समारंभात त्या बोलत होत्या.
मंत्री विद्या ठाकूर यांच्या हस्ते समरजितसिंह घाटगे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जयप्रकाश ठाकूर, महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, अशोक देसाई, विजय जाधव, सुभाष रामुगडे, आदी प्रमुख उपस्थित होते.
समरजितसिंह घाटगे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्यावर म्हाडा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे.
संदीप देसाई ,बाबा देसाई, महेश जाधव यांनी दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनेमध्ये १५ दिवस पूर्णवेळ विस्तारक म्हणून बाहेर पडण्याचे आवाहन केले. विजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. अशोक देसाई यांनी आभार मानले.
यावेळी भाजप महापालिका गटनेते विजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, श्रीकांत घुंटे, गणेश देसाई, मारुती भागोजी, नगरसेविका सविता भालकर, उमा इंगळे, अश्विनी बारामते, संपतराव पवार, संतोष माळी, राजू मोरे, संजय सावंत, नजीर देसाई, भारती जोशी, किशोरी स्वामी, मधुमती पावनगडकर, सुरेश जरग, नचिकेत भुर्के, प्रभावती इनामदार, सुलभा मुजूमदार, दिग्विजय कालेकर, आदी उपस्थित होते.

कागलचा पुढील आमदार ‘भाजप’चाच
येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघामध्ये भाजपचाच आमदार होईल, असा विश्वास समरजितसिंह घाटगे यांनी यावेळी बोेलताना व्यक्त केला.

Web Title: BJP activists mobilize for the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.