भाजपने लावले महावितरणच्या प्रवेशद्वाराला टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:44 AM2021-02-06T04:44:25+5:302021-02-06T04:44:25+5:30

कोल्हापूर वीज बिलमाफी न देणाऱ्या महावितरणविरोधात घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी कार्यालयाच्या ...

BJP blocked the entrance of Mahavitaran | भाजपने लावले महावितरणच्या प्रवेशद्वाराला टाळे

भाजपने लावले महावितरणच्या प्रवेशद्वाराला टाळे

Next

कोल्हापूर वीज बिलमाफी न देणाऱ्या महावितरणविरोधात घोषणाबाजी करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी कार्यालयाच्या प्रवेशद्वारला टाळे ठोकले. यावेळी पहिले आणि दुसऱ्या प्रवेशद्वाराला कुलूप घालणाऱ्या कार्यकर्त्यांना अडवताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. अखेर आंदोलकांना ताब्यात घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

भाजपच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन घेण्यात आले. सकाळी १० नंतर महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयाबाहेर भाजपचे कार्यकर्ते जमू लागले. यावेळी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.

संघटन सरचिटणीस अशोक देसाई म्हणाले, लॉकडाऊनच्या काळामध्ये काही लोकांचा रोजगार गेला अशा लोकांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिले दिली. जिल्हा सरचिटणीस विजय जाधव म्हणाले, महाराष्ट्राशेजारील काही राज्यांमध्ये लॉकडाऊन काळामध्ये विज बिल माफ करण्यात आले; पण महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील साडेचार कोटी कनेक्शन तोडण्याची धमकी दिली.

किसान मोर्चा अध्यक्ष भगवान काटे म्हणाले, कृषी पंप विषयीदेखील विज बिल विषयात खोटे आश्वासन देऊन हे महाविकास आघाडी सरकार राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, लॉकडाऊन काळामध्ये राज्यातील जनतेला विविध योजनांमधून मोदी सरकारने मदत देऊन सहकार्य केले होते; पण महाराष्ट्रात असणाऱ्या तीन पक्षांच्या तिघाडी सरकारने कोणत्याही योजनेतून मदत तर दिलीच नाही याउलट वाढीव वीज बिले देऊन ती बिले भरली नाही तर कनेक्शन तोडण्याच्या धमक्याच नागरिकांना दिल्या.

महाविकास आघाडीच्या निषेधाचे फलक यावेळी कार्यकत्यांनी आणले होते. प्रास्ताविक हेमंत आराध्ये यांनी केले. यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप मेत्राणी, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, मारुती भागोजी, अमोल पालोजी, विजय अग्रवाल, जिल्हा चिटणीस प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, डॉ. सदानंद राजवर्धन, रवींद्र मुतगी, भरत काळे, संतोष माळी, धीरज पाटील, संजय जासूद, आशिष कपडेकर, अभिजीत शिंदे, ओंकार खराडे, अतुल चव्हाण, साजन माने, युवा मोर्चा अध्यक्ष विजय खाडे- पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

०५०२२०२१ कोल बीजेपी ०१/२

वीज बिलमाफीसाठी भाजपच्या वतीने महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोण्याचे आंदोलन शुक्रवारी सकाळी झाले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात झटापट उडाली.

Web Title: BJP blocked the entrance of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.