भाजपने इतिहास बदलला : 35 जागा जिंकून बेळगाव मनपावर वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:52+5:302021-09-07T04:29:52+5:30
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बेळगावचा महापौर हा राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा असणार आहे. याला कारण ...
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच बेळगावचा महापौर हा राष्ट्रीय पक्षाचा म्हणजे भारतीय जनता पक्षाचा असणार आहे. याला कारण 58 पैकी 35 जागा जिंकून भाजपने बेळगाव महापालिकेवर मिळविलेले वर्चस्व होय. भाजपने गड जिंकला असताना काँग्रेसला आणि महाराष्ट्र एकीकरण समितीसह अन्य पक्षांना मात्र अनुक्रमे 10 व 13 जागांवर समाधान मानावे लागले आहे.
बेळगाव महापालिका निवडणुकीची मतमोजणी कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल येथे सोमवारी कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली. या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षाने बाजी मारली असून, धक्कादायक निकाल समोर आले आहेत. बेळगाव महापालिकेवर यापूर्वी सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते. तथापि, यावेळी इतिहास घडविताना निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकत भाजपने सत्ता काबीज केली आहे.
बेळगाव महापालिकेतील वर्चस्वासाठी 33 ही मॅजिक फिगर होती. काँग्रेसला 10 जागा, अपक्ष उमेदवार 8 जागा, म. ए. समितीला 4 जागा आणि एमआयएमला 1 जागेवर समाधान मानावे लागले.
यापूर्वी बेळगाव महापालिका निवडणूक भाषिक मुद्यावर लढविली जात होती. मात्र, यावेळी भाजप, काँग्रेस, निजद, आम आदमी, एमआयएम आदी राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरल्याने पक्षांच्या चिन्हांवर ही निवडणूक लढविली आणि त्यामध्ये भाजपची सरशी झाली. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करीत एकच जल्लोष केला.
............
प्रभागनिहाय निकाल
1 इकरा मुल्ला- अपक्ष
2-मुजमिल डोनी काँग्रेस
3-ज्योती कडोलकर काँग्रेस
4- जयतीर्थ सौदत्ती भाजप
5-हाफिझा मुल्ला काँग्रेस
6-संतोष पेडणेकर भाजप
7-शंकर पाटील अपक्ष
8-महंमद संगोळी- काँग्रेस
9-पूजा पाटील अपक्ष
10- वैशाली भातकांडे समिती
11-समीउल्ला माडीवाले काँग्रेस
12-मोदीनसाब मतवाले अपक्ष
13- रेश्मा भैरकदार काँग्रेस
14- शिवाजी मंडोळकर समिती
15- नेत्रावती भागवत भाजप
16- राजू भातकांडे भाजप
17- सविता कांबळे भाजप
18- शाहीदखन पठाण एमआयएम 19- रियाज किल्लेदार अपक्ष
20 शकिला मुल्ला काँग्रेस
21 प्रीती कामकर भाजप
22 रवी सांबरेकर भाजप
23 जयंत जाधव भाजप
24 गिरीश धोंगडी भाजप
25 जरिना फतेखान अपक्ष
26 रेखा हुगार भाजप
27 रवी साळुंके समिती
28 रवी धोत्रे भाजप
29 नितीन जाधव भाजप
30 ब्रामहानंद मिरजकर भाजप
31- वीणा विजापुरे भाजप
32-संदीप जिरग्याल भाजप
33- रेश्मा पाटील भाजप
34 श्रेयस नाकाडी भाजप
35 लक्ष्मी राठोड भाजप
36 राजशेखर डोनी भाजप
37 शामोबीन पठाण काँग्रेस
38 अजीम पटवेगार अपक्ष
39 उदयकुमार उपरी भाजप
40 रेश्मा कामकर भाजप
41 मंगेश पवार भाजप
42 अभिजित जवळकर भाजप
43 वाणी जोशी भाजप
44 आनंद चव्हाण भाजप
45 रूपा चिक्कलदींनी भाजप
46 हणमंत कोंगाली भाजप
47 अस्मिता पाटील अपक्ष
48 बसवराज मोदगेकर समिती
49 दीपाली टोपगी भाजप
50 सारिका पाटील भाजप
51- श्रीशैल कांबळे भाजप
52 खुर्शिदा मुल्ला काँग्रेस
53 रमेश मैलुगोळ भाजप
54 माधवी राघोचे भाजप
55 सविता पाटील भाजप
56 लक्ष्मी लोकरी काँग्रेस
57 शोभा सोमनाचे भाजप
58 प्रिया सातगौडा भाजप