भाजप-कॉँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण

By admin | Published: August 14, 2015 11:59 PM2015-08-14T23:59:38+5:302015-08-14T23:59:38+5:30

सभापती निवडी : निवडणुकीच्या स्थगितीमुळे हाळवणकर यांची कॉँग्रेसवर कुरघोडी

BJP-Congress politics in Kurghadi | भाजप-कॉँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण

भाजप-कॉँग्रेसमध्ये कुरघोडीचे राजकारण

Next

राजाराम पाटील - इचलकरंजीयेथील नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाच्या सभापतिपदाच्या निवडणुकीला स्थगिती देऊन
आमदार सुरेश हाळवणकर यांनी कॉँग्रेसवर कुरघोडी केली आहे. परिणामी भाजप आणि कॉँग्रेसमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू झाले आहे.इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहर तसेच चंदूर, कबनूर, कोरोची, तारदाळ आणि खोतवाडी अशा गावांचा समावेश आहे. मात्र, इचलकरंजीची लोकसंख्या तीन लाख असल्याने मतदारसंघावर शहराचेच वर्चस्व राहते. सन २०११ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसचे २९, राष्ट्रवादीचे ११ व भाजपप्रणीत शहर विकास आघाडीचे १७ असे नगरसेवक निवडून आले. साहजिकच कॉँग्रेसने पालिकेत सत्ता स्थापन केली.या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नगराध्यक्षपदाची मुदत संपली; पण शुभांगी बिरंजे यांनी ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाच्या पाठिंब्यावर बंड केले. पालिकेत आमदार हाळवणकर यांच्या नेतृत्वाखालील ‘शविआ’ ने कॉँग्रेसच्याच सत्तेला शह दिला; पण कॉँग्रेसने बिरंजे यांना सहकार्य देऊन काटशह दिला.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही येथील राजकारणाचे पडसाद उमटले. चंदूरमध्ये कॉँग्रेसने बहुमत गमावले, तर कबनूरमध्ये भाजपला १५ पैकी फक्त चार सदस्यांवर समाधान मानावे लागले. आता ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपाठोपाठ इचलकरंजीतील नगरपालिका प्राथमिक शिक्षक मंडळाची सभापती निवड १३ आॅगस्टला होती. मात्र, शिक्षण मंडळावर शासन नियुक्त सदस्यांची नेमणूक नसल्याने दोन्ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे भाजपचे राजू हणबर यांनी शासनाच्या शिक्षणमंत्र्यांकडे, शिक्षण मंडळाकडील सदस्य संख्या अपूर्ण असल्याची तक्रार केली. या तक्रारीचा पाठपुरावा आमदार हाळवणकर यांनी केला आणि शिक्षण मंडळ सभापती निवडीला स्थगिती घेतली.

सभापतिपद वादग्रस्तच
सन २०१२ मध्ये नगरपालिका शिक्षण मंडळाकडे कॉँग्रेसचे सहा, राष्ट्रवादीचा एक व ‘शविआ’ चे तीन असे सदस्य निवडले गेले. त्यानंतर कॉँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक शासन नियुक्त सदस्य निवडीसाठी शेखर शहा व मेहबूब मुजावर यांची नावे घोषित झाली; पण त्यांची नावे शासकीय राजपत्रात समाविष्ट झाली नाहीत. तरीही प्रथम दत्तात्रय कित्तुरे व नंतर तौफिक मुजावर हे सभापती झाले. आता मुजावर यांनी राजीनामा दिल्याने सभापतिपदासाठी निवडणूक लागली; पण नगरपालिकेतील बदललेले राजकीय संदर्भ आणि कॉँग्रेस व भाजपच्या कुरघोड्या यातच सभापती निवड अडकली आहे.

Web Title: BJP-Congress politics in Kurghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.