भाजपने धनगर समाजाला फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:43+5:302020-12-08T04:21:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवितो, असे आश्वासन दिलेल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीत धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न सोडवितो, असे आश्वासन दिलेल्या भाजपने या समाजाची फसवणूक केली. मात्र, महाविकास आघाडी सरकार समाजाला न्याय मिळवून देईल, असे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. कोल्हापूर जिल्हा धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने आरक्षण अंमलबजावणी करा या मागणीचे निवेदन सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आले. जिल्ह्यातील धनगर समाजातील सर्व संघटना आरक्षण मुद्दयावर एकत्र आल्या असून, जिल्हा धनगर समाज समन्वय समितीची स्थापना केली आहे. समितीच्या वतीने तत्काळ आरक्षण अंमलबजावणी करा. या मागणीचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे मंत्री मुश्रीफ यांना दिले. शिष्टमंडळात बबनराव रानगे, कृष्णात पुजारी, प्रा. शंकर पुजारी, प्रा. राजेंद्र कोळेकर, राजेश तांबवे, मच्छिंद्रनाथ बनसोडे, बयाजी शेळके, छगन नांगरे, प्रा. लक्ष्मण करपे, राघू हजारे, महादेव सनगर, तम्मा शिरोले, डॉ. संदीप हजारे, बाबूराव रानगे, राजेश बाणदार, आदी सहभागी होते.
फोटो ओळी ; धनगर समाजास आरक्षण द्या, या मागणीचे निवेदन धनगर समाज समन्वय समितीच्या वतीने सोमवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिले. यावेळी बाबूराव रानगे, कृष्णात पुजारी, बबनराव रानगे, आदी उपस्थित होते. (फोटो-०७१२२०२०-कोल-धनगर)
- राजाराम लोंढे