भाजपकडून शेतकऱ्यांची फसवणूक : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:26 AM2018-06-02T00:26:14+5:302018-06-02T00:26:14+5:30
गडहिंग्लज : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारचा शेतकºयांकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. त्यामुळे देशात कृषी व बेरोजगारीचे संकट ओढवले आहे. मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने तुटपुंजी कर्जमाफी आणि रोजगार निर्मिती करून शेतकरी आणि बेरोजगारांची फसवणूक केली आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला.
ऐनापूर (ता. गडहिंंग्लज) येथे शेतकरी मेळावा आणि सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सातारा जिल्हा काँगे्रसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील होते. यावेळी यशवंत सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच दिग्विजय कुराडे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक व मान्यवरांचा सत्कार झाला.
चव्हाण म्हणाले, काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने एकरकमी ७२ हजार कोटींची कर्जमाफी देऊन दुष्काळग्रस्त शेतकºयांना दिलासा दिला होता. मात्र, ३४ हजार कोटींची कर्जे माफ केल्याचे सांगणाºया भाजप सरकारकडून शेतकºयांना अद्याप १० ते १२ कोटीही मिळालेले नाहीत. वर्षाला दोन कोटी नवीन नोकºया निर्माण करण्याची घोषणा केलेल्या सरकारने १० लाख नोकºयादेखील निर्माण केलेल्या नाहीत. त्यामुळे खोटी आश्वासने दिलेल्या सरकारला शेतकरी व युवकच खाली खेचतील.
आमदार पाटील म्हणाले, यशवंत ग्रामपंचायतीचा पुरस्कार मिळविलेल्या ऐनापूर ग्रामपंचायतीचे काम अन्य गावांनाही प्रेरणादायी असून, गावच्या विकासासाठी १० लाखांचा निधी देत आहे.
सरपंच कुराडे यांनी स्वागत केले. काँगे्रसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले. तानाजी चौगुले व सुरेश दास यांनी सूत्रसंचालन केले. मेळाव्यास काँगे्रसचे तालुकाध्यक्ष बी. एन. पाटील, किसनराव कुराडे, जे. बी. बार्देस्कर, जयप्रकाश नलवडे, जयवंत शिंपी, राजेश नरसिंगराव पाटील, बसवराज आजरी, बाबासाहेब पाटील, अनिल कुराडे, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची संख्या लक्षणीय होती.