Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

By पोपट केशव पवार | Published: March 9, 2024 01:37 PM2024-03-09T13:37:31+5:302024-03-09T13:37:57+5:30

'शाहू महाराजांसाठी ताकतीनिशी उतरणार'

BJP defeat is the target rather than seats, AAP Maharashtra Pradesh Working President expressed a clear opinion | Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

Kolhapur: जागांपेक्षा भाजपचा पराभव हेच टार्गेट, 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्षांनी व्यक्त केलं स्पष्ट मत

कोल्हापूर : आम आदमी पार्टी इंडिया आघाडीचा घटक असून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतून 'आप'ला किती जागा मिळतील? यापेक्षा भाजपचा पराभव करणे हेच आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे असल्याचे 'आप'चे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. महाराष्ट्रात लोकसभेला 'आप'ला काही जागा मिळाव्यात अशी मागणी वरिष्ठांकडे केल्याचेही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'आप'ची राज्यभर संघटन बांधणी सुरु असून फाटके यांनी शनिवारी कोल्हापुरात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपच्याही महत्वकांक्षा आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काही जागांची मागणी वरिष्ठांकडे केली असली तरी कोण किती जागा लढवतोय, कुणाला किती जागा हव्या आहेत यात आम्हाला रस नाही. त्यापेक्षा भाजपला पराभव करणे हेच आमचे उदिष्ठ आहे. यावेळी संदीप देसाई, उत्तम पाटील,अरुण कदम, अभिजित कांबळे, दुष्यंत माने, मोईन मोकाशी उपस्थित होते.

शाहू महाराजांसाठी ताकतीनिशी उतरणार

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीतून निवडणूक लढविणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा विचार आपण सर्वांनी पुढे नेण्याची गरज आहे. त्यामुळे शाहू छत्रपती यांच्यापाठीमागे पूर्ण ताकतीनिशी 'आप' उभी राहिल, अशी ग्वाही फाटके यांनी दिली.

Web Title: BJP defeat is the target rather than seats, AAP Maharashtra Pradesh Working President expressed a clear opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.