..तर मी मुश्रीफांची म्हणाल तेथे येऊन माफी मागेन, समरजित घाटगेंचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 06:28 PM2022-12-30T18:28:36+5:302022-12-30T18:31:00+5:30
आमदार हसन मुश्रीफ हे जाहीरपणे खोटे सांगत सुटले आहेत. त्यांनी तसा पुरावा सादर करावा
कागल : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना निराधार योजनेच्या लाभार्थीची पेन्शन ६०० रूपयांवरून १००० रूपये करण्यात आली. तसा जी आर २० ऑगस्ट २०१९ रोजी प्रसिद्ध झाला आहे. असे असताना आमदार हसन मुश्रीफ हे आम्हीच सहाशे रूपयांची पेन्शन एक हजार केली असे जाहीरपणे खोटे सांगत सुटले आहेत. त्यांनी तसा पुरावा सादर करावा मी त्यांची ते म्हणतील तेथे येऊन माफी मागायला तयार आहे. अन्यथा त्यांनी जनतेची माफी मागावी अशी टिका भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी येथील बापुसाहेब महाराज चौकात आयोजित कार्यक्रमात केली.
यावेळी राजमाता जिजाऊ महिला समितीच्या नवोदिता घाटगे, माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी, राजेंद्र जाधव, आप्पासाहेब भोसले, आनंदा पसारे, संभाजी नाईक, लिलाधर घस्ते, प्रमोद कदम, दिपक मगर, अरूण गुरव आदी मान्यवर व विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समरजित घाटगे म्हणाले, मोदी सरकारच्या योजना आपण आणल्या म्हणुन राबवु नका. या योजनावर पंतप्रधानांचा फोटो आहे. लोकांच्या लक्षात येईल. कागलचा आठवडी बाजार कोणाच्यातरी वाहनांच्या ताफ्याला जाण्यास अडचण होते म्हणुन मुख्य बाजारपेठेतुन हालवीला गेला. तो आम्ही पुर्वरत करणार आहोत. या बद्दल मी आज बाजाराची पाहणीही केली आहे.