आवाडेंचे जाहीर सभेत भाजप प्रेम व्यक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 06:35 PM2020-12-11T18:35:38+5:302020-12-11T18:39:03+5:30
political, Bjp, PrakashAwade, Ichlkarnji, Kolhapurnews कोरोनाच्या काळात उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यांना राज्य शासनाकडून एक पैशाचीही मदत झाली नाही, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे उद्योग धंद्याला उभारी मिळाली, असे भाजपबद्दल प्रेम आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर सभेत व्यक्त केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये आमदार आवाडे यांची भाजपच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीबद्दल जोरदार चर्चा रंगली होती.
इचलकरंजी : कोरोनाच्या काळात उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी यांना राज्य शासनाकडून एक पैशाचीही मदत झाली नाही, अशी टीका करत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या मदतीमुळे उद्योग धंद्याला उभारी मिळाली, असे भाजपबद्दल प्रेम आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर सभेत व्यक्त केले. त्यामुळे उपस्थितांमध्ये आमदार आवाडे यांची भाजपच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीबद्दल जोरदार चर्चा रंगली होती.
एका बॅँकेच्या वार्षिक सभेत केलेल्या भाषणात आवाडे यांचे भाजप प्रेम प्रकर्षाने जाणवले. सभेत बोलताना आवाडे म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील अर्थव्यवस्था कोलमडली. त्याचा परिणाम सर्व प्रकारच्या वित्तीय संस्थांना सोसावा लागला.
यामधून सावरण्यासाठी उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी, शेतकरी, आदी घटकांना शासनाकडून मदतीची अपेक्षा होती; पण शासनाने मदत केली नाही, असा आरोप करत राज्य शासनाच्या संकट काळातील धोरणावर तीव्र शब्दात टीका केली.
याउलट केंद्र शासन म्हणजे भाजपावर स्तुतीसुमने उधळत केंद्राच्या मदतीमुळे उद्योग-व्यवसायांना उभारी घेण्यासाठी मदत मिळाली. देशाच्या अर्थव्यवस्थेला आता गती येत असून, आगामी काळात सर्व घटकांना निश्चितपणे ऊर्जितावस्था मिळेल, असा विश्वासही आवाडे यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून आवाडे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेला शुक्रवारी पुन्हा उभारी मिळाली. प्रवेशाबाबत आवाडे यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले असले तरी चर्चेला मात्र जोर चढला आहे.