भाजपने रॅलीद्वार केला मोदींना पुन्हा विजयी करण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 11:15 AM2019-03-04T11:15:54+5:302019-03-04T11:17:08+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी भाजपतर्फे रविवारी शहरातून ‘विजय संकल्प दुचाकी रॅली’ काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विजयासह ‘भारतमाता की जय...,’ ‘वंदे मातरम्...’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांत एकाच वेळी ही रॅली काढण्यात आली.
कोल्हापूर : येत्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयी करण्यासाठी भाजपतर्फे रविवारी शहरातून ‘विजय संकल्प दुचाकी रॅली’ काढण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विजयासह ‘भारतमाता की जय...,’ ‘वंदे मातरम्...’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. महाराष्ट्रातील सर्व विधानसभा मतदारसंघांत एकाच वेळी ही रॅली काढण्यात आली.
सकाळी साडेअकरा वाजता गांधी मैदान येथून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व भाजप महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांच्या नेतृत्वाखाली दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा असलेला चित्ररथ रॅलीच्या पुढे होता.
खरी कॉर्नर, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी, तोरस्कर चौक, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, गोखले कॉलेज, राजारामपुरी, बागल चौक, सासने मैदान, शासकीय विश्रामगृह, लाईन बझार, कसबा बावडा, एस. पी. आॅफिस, महापालिका चौक, शिवाजी चौक या मार्गावरून फिरून पुन्हा गांधी मैदान येथे रॅलीची सांगता झाली.
संदीप देसाई म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ या घोषणेप्रमाणे भाजपच्या प्रत्येक बूथप्रमुख व बूथसदस्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना घराघरांत जाऊन सांगाव्यात.
महेश जाधव म्हणाले, पुलवामा हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली म्हणून हल्ल्यानंतरच्या १३ व्या दिवशीच दुसरा सर्जिकल स्ट्राईक घडवून भारताने ३५० च्या वर दहशतवाद्यांना यमसदनी पाठविले. हे पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच शक्य झाले. त्यामुळे पुन्हा अशाच कणखर नेत्याला निवडून दिले पाहिजे.
रॅलीत दिलीप मेत्राणी, संतोष भिवटे, हेमंत आराध्ये, अमोल पालोजी, मारुती भागोजी, सुरेश जरग, श्रीकांत घुंटे, आर. डी. पाटील, नगरसेवक अजित ठाणेकर, किरण नकाते यांच्यासह नचिकेत भुर्के, अॅड. संपतराव पवार, अप्पा लाड, विजय अगरवाल, नजीर देसाई, संजय सावंत, आशिष कपडेकर, चंद्रकांत घाटगे, दिग्विजय कालेकर, डॉ. सदानंद राजवर्धन, भारती जोशी, सुलभा मुजुमदार, किशोरी स्वामी, गायत्री राऊत, प्रदीप पंडे, संतोष माळी, सतीश घरपणकर, विवेक कुलकर्णी, हेमंत कांदेकर, गणेश खाडे, मुसाभाई कुलकर्णी, आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.