भाजपने सहकार मोडीत काढला : प्रकाश आबिटकर- मंडलिक प्रतिष्ठानचा मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:35 AM2018-02-27T00:35:19+5:302018-02-27T00:35:19+5:30
कसबा सांगाव : भाजपाचा प्रत्येक बाबतीत अतिरेक सुरू आहे. विकासाची कामे प्रत्यक्षात होत नसून तीन वर्षांत सहकारात नवीन सूतगिरण्या, साखर कारखाने झाले नाहीत.
कसबा सांगाव : भाजपाचा प्रत्येक बाबतीत अतिरेक सुरू आहे. विकासाची कामे प्रत्यक्षात होत नसून तीन वर्षांत सहकारात नवीन सूतगिरण्या, साखर कारखाने झाले नाहीत. फक्त आहे ते मोडायचे काम चालले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेपासून जिल्हा बँकेपर्यंत फक्त आडवाआडवी सुरू आहे. अशा कारभारामुळे पुढच्या पिढ्यांचे नुकसान करण्याचे काम सुरू आहे, असा घणाघात आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला.
कागल येथे मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त युवा चैतन्य मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वीरेंद्र मंडलिक, सौरभ शेट्टी, जितेंद्र कदम, हर्षल सुर्वे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आबिटकर म्हणाले की, एका बाजूला लोकांच्या विश्वासाचे राजकारण सुरू आहे, तर दुसºया बाजूला पैसे, पदे खिरापती वाटण्याचे सुरू आहे. सत्तेच्या जोरावर लोकांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वर्गीय खासदार मंडलिक व खासदार राजू शेट्टी यांनी लोकांच्या विश्वासावरच निवडणुका जिंकल्या. आज माणसांचे मन सांभाळणे हे राजकारण्यांचे महत्त्वाचे काम आहे,
वीरेंद्र मंडलिक म्हणाले, या प्रतिष्ठानचा विस्तार वाढला असून शाहूंच्या विचाराचे खरे वारसदार आम्हीच आहोत. खासदार मंडलिकसाहेबांना जशी साथ दिली, तशी मला साथ द्या.
कार्यक्रमासाठी दिग्विजय कुºहाडे, राजेखान जमादार, संताजी घोरपडे (खडकेवाडा), धनराज घाटगे, बाबा नांदेकर, रमेश पाटील, अभिजित तायशेटे, विद्याधर गुरबे, विवेक कुलकर्णी, बाबगोंड पाटील, कैलास जाधव, आदी उपस्थित होते.
पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये कामगारांचे प्रश्न बिकट झाले असून, कोणालाही कायम केले जात नाही. त्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने मंडलिक प्रतिष्ठानने काम करावे. कामगार आयुक्त आणि कारखानदारांचे साटेलोटे आहे. कामगारांच्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी काम करा. प्रत्येकजण स्वत:च्या आयुष्याचा आमदार आहे. त्याचा इगो दुखवू नका, नाहीतर तुमची आमदारकी गेली उडत, असा टोला आबिटकर यांनी लगावला.
कागल येथे मंडलिक युवा प्रतिष्ठानच्या ५ व्या वर्धापनदिनानिमित्त काढलेल्या रॅलीत वीरेंद्र मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर सहभागी झाले होते.