भाजपने गुंडांना सुधारण्याची शाळा काढली

By admin | Published: February 19, 2017 12:12 AM2017-02-19T00:12:12+5:302017-02-19T00:12:12+5:30

पृथ्वीराज चव्हाण यांचा घणाघात : विकास आघाडीची जातीयवादी पक्षासोबत युती; गद्दारांना थारा देऊ नका

BJP launched a school to improve the goons | भाजपने गुंडांना सुधारण्याची शाळा काढली

भाजपने गुंडांना सुधारण्याची शाळा काढली

Next

मलकापूर : भाजप सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीच देणेघेणे नाही. भुलथापा मारत सरकार अशक्य अशा केवळ घोषणाबाजी करत आहे. पैशाच्या हव्यासापोटी भाजपने धनसंपत्ती असणाऱ्या गुंडांना पक्षात घेऊन गुंडांना सुधारण्याची शाळाच काढली आहे, असा घणाघाती आरोप करून जातियवादी पक्षाबरोबर छुपी युती करून गेली पस्तीस वर्षे कऱ्हाड दक्षिणेत गद्दारी करणाऱ्या आघाडीला या निवडणूकीत थारा देऊ नका, असे मत माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
मुंढे, ता. कऱ्हाड येथे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी आमदार आनंदराव पाटील, मनोहर शिंदे, आनंदराव घोडके, अजित पाटील चिखलीकर, बंडानाना जगताप, राजेश पाटील-वाठारकर, इंद्रजीत चव्हाण, रामचंद्र पाटील उपस्थित होते.
आमदार चव्हाण म्हणाले, राज्य व केंद्रातील भाजप सरकारने विजय मल्ल्या, ललीत मोदीसारख्या अनेकांना सहकार्य करून एका अर्थाने देशातील जनतेची फसवणूक केली आहे. नोटाबंदीमुळे देशातील ४० लाख लोक बेरोजगार झाले आहेत. या निर्णयामुळे काहीही साध्य झालेले नाही. या सरकारला आम्ही नियोजित केलेले प्रकल्प अद्याप पूर्ण करता आले नाहीत. शेती मालाला हमी भाव देता आलेला नाही. उलट धनदांडग्या उद्योगपतींचे ऊखळ पांढरे करण्याचा घाट घातला आहे. खोटे बोल पण रेटून बोल, हा मंत्र घेऊन मोदी म्हणजे हिटलरचे दुसरे रूप आहे. ही हुकूमशाहीकडे जाणारी पावले वेळीच थांबवा. गुलाल तिकडे चांगभले म्हणणारी मंडळी राजकारणाला कलंक आहेत. (वार्ताहर)


थेट चचेर्साठी मोदींना आव्हान
भाजप सरकारने घेतलेले चुकीचे निर्णय व त्या चुकीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशातील जनतेला झालेला त्रास याबाबत मोदींनी माझ्याशी समोरासमोर चर्चा करावी. महाराष्ट्र व गुजरात राज्यपातळीवर चर्चा करण्यासाठी मोदींनी मुंबईत यावे किंवा मी अहमदाबादमध्ये येतो. त्यांनी माझ्याशी थेट चर्चा करावी, असे आव्हान माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींना दिले.
चंद्रकांत पाटलांच्या गळाला मदनराव
इतर पक्षातील पैसेवाल्यांना भाजपमध्ये घेऊन चंद्रकांत पाटलांनी त्यांची शेपटं कापण्याचेच काम केले आहे. आपल्यातून गेलेले काल मुख्यमंत्र्यांच्या व्यासपिठावर धरून आणल्यासारखे बसले होते. बाबांच्या मांडीलामांडी लावून बसणारे मदनराव चंद्रकांत पाटलांच्या गळाला लागले आहेत. जे जे पक्षाच्या विरोधात गेले त्यांचे वाटोळे झाले आहे, अशी कोपरखळी अजित पाटील-चिखलीकर यांनी मदनराव मोहीते यांना मारली.

Web Title: BJP launched a school to improve the goons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.