मंदिर उघडण्यासाठी कोल्हापुरात ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन, भाजपचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 12:15 PM2020-08-29T12:15:40+5:302020-08-29T12:21:34+5:30

कोल्हापूरात हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ, इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज, शनिवारी सकाळी ११ वाजता ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले.

BJP participates in bell ringing agitation in front of 9 temples in Kolhapur to open the temple | मंदिर उघडण्यासाठी कोल्हापुरात ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन, भाजपचा सहभाग

मंदिर उघडण्यासाठी कोल्हापुरात ९ मंदिरांसमोर ‘घंटानाद आंदोलन’ केले. या आंदोलनात भाजप सहभागी झाले होते. (छाया : आदित्य वेल्हाळ )

Next
ठळक मुद्देमंदिर उघडण्यासाठी कोल्हापुरात घंटानाद आंदोलन९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन,भाजपचा सहभाग

कोल्हापूर : कोल्हापूरात हिंदू युवा प्रतिष्ठान, हिंदू एकता आंदोलन, दत्त संप्रदाय, पंत बाळेकुंद्री महाराज संप्रदाय, परमपूज्य यादव महाराज मठ, इत्यादी संघटना व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज, शनिवारी सकाळी ११ वाजता ९ मंदिरांसमोर घंटानाद आंदोलन केले.

कसबा बावडा रेणुका मंदिर, वटेश्वर मंदिर एस. टी. स्टँड, दत्तमंदिर कॉमर्स कॉलेज, राजारामपुरी १२वी गल्ली येथील मारुती मंदिर व टेंबलाई मंदिर, शेषनारायण मंदिर मिरजकर तिकटी, अंबाबाई मंदिर, महाद्वार चौक, दत्त मंदिर गंगावेश, ओढ्यावरचा गणपती, उमा टॉकीजनजीक व रेणुका मंदिर, मंगळवार पेठ अशा ९ मंदिरांसमोर ह्यघंटानाद आंदोलनह्ण केले. या आंदोलनात भाजप सहभागी झाले होते. 

सामाजिक अंतर आणि नियमांसह राज्यातील देवस्थाने, धार्मिक स्थळे सुरू करून भजन, कीर्तन व पूजनास परवानगी मिळावी, या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील संत, महंत, आचार्य, धर्माचार्य, धार्मिक, आध्यात्मिक व सांप्रदायिक क्षेत्रांतील मंडळी तसेच देवस्थाने, तीर्थक्षेत्रे येथील उदरनिर्वाह निगडित असलेल्या व्यावसायिकांनी हे आंदोलन केल्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी सांगितले.

Web Title: BJP participates in bell ringing agitation in front of 9 temples in Kolhapur to open the temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.