मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची तीव्र निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:17+5:302021-01-19T04:25:17+5:30

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. असे असतानाही शासन त्यांना पाठीशी घालत ...

BJP protests for Munde's resignation | मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची तीव्र निदर्शने

मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपची तीव्र निदर्शने

Next

कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. असे असतानाही शासन त्यांना पाठीशी घालत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांच्या मंत्रीपदाचा त्वरित राजीनामा घ्यावा, अशी मागणी करत भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

प्रदेश कार्यकारिणी सदस्य नीता केळकर म्हणाल्या, केंद्राने कोणत्याही पीडित महिलेची तक्रार त्वरित नोंदवून घेण्याचे निर्देश दिले असतानाही पोलीस आयुक्तांकडे जाऊनदेखील पीडितेची तक्रार घेतली जात नाही. महाविकास आघाडी सत्तेत असताना राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत. ग्रामीण महिला आघाडी जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक म्हणाल्या, मुंडे यांनी आपल्याला पाच अपत्ये असल्याची माहिती निवडणूक आयोगापासून लपवली आहे. गायत्री राऊत यांनी मत व्यक्त केेले.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष भारती जोशी, चिटणीस सुलभा मुजुमदार, सरचिटणीस आसावरी जुगदार, मंगल निपाणीकर, लता बर्गे, शोभा कोळी, सुनीता सूर्यवंशी, धनश्री तोडकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

--

फोटो नं १८०१२०२१-कोल-बीजेपी महिला आघाडी

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी भाजप महिला मोर्चाच्या वतीने मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यावेळी नीता केळकर, शौमिका महाडीक यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

--

Web Title: BJP protests for Munde's resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.