भाजपतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:23 AM2021-05-09T04:23:36+5:302021-05-09T04:23:36+5:30

कोल्हापूर : भाजप महानगर कोल्हापूरच्यावतीने गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष ...

BJP provides oxygen concentrator facility | भाजपतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा

भाजपतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची सुविधा

Next

कोल्हापूर : भाजप महानगर कोल्हापूरच्यावतीने गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपक्रमाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शनिवारी झाला. सध्या गरजूंसाठी दहा कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

आमदार पाटील म्हणाले, भाजपतर्फे राज्यात अशा पध्दतीचे एक हजार कॉन्सन्ट्रेटर देण्याची योजना आहे. परंतु टंचाई असल्याने आम्हाला कोल्हापूरसाठी ५० ची गरज असताना, केवळ दहाच मिळाले. तरीही भाजप शहर कार्यालयातून ते नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. रुग्णालयात दाखल होण्याआधी किंवा गरज असेल त्यावेळी डॉक्टरांच्या शिफारशीनंतर हे कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शहरामध्ये पुरेशी व्यवस्था झाल्यानंतर तालुका पातळीवर ही सोय करण्याचा विचार आहे. यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विजय जाधव, अजित ठाणेकर, हेमंत आराध्ये, दिलीप मैत्राणी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

रुग्णांच्या नातेवाईकांना चपाती भाजी

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाअभावी गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रविवारपासून सीपीआर आणि सावित्रीबाई फुले रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत चपाती-भाजी पुरवण्यात येणार आहे.

चौकट

कणेरी मठावर आणखी एक ऑक्सिजन प्रकल्प

सध्या कणेरी मठावरील रुग्णालयाचा एक ऑक्सिजन प्रकल्प कार्यरत आहे. गेल्यावर्षी या ठिकाणी उभारलेल्या कोविड रुग्णालयाचा चांगला फायदा झाला. त्यामुळे आता या ठिकाणी आणखी एक ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. इतरवेळी येथील ऑक्सिजन अन्य रुग्णालयांना पुरवण्यात येईल.

०८०५२०२१ कोल बीजेपी ०१

कोल्हापुरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते शनिवारी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरणाचा प्रारंभ करण्यात आला.

Web Title: BJP provides oxygen concentrator facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.