Kdcc Bank Election : सत्ताधारी आघाडीत भाजप 'इन' शिवसेना 'आऊट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2021 06:34 PM2021-12-21T18:34:09+5:302021-12-21T18:36:40+5:30

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झाली. तर दुसरीकडे भाजपने सत्ताधारी आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP with ruling alliance in Kolhapur district central bank elections | Kdcc Bank Election : सत्ताधारी आघाडीत भाजप 'इन' शिवसेना 'आऊट'

Kdcc Bank Election : सत्ताधारी आघाडीत भाजप 'इन' शिवसेना 'आऊट'

googlenewsNext

कागल : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रोज नव्या घडामोडी घडत आहेत. जागा वाटपावरुन सत्तारुढ आघाडीमध्ये गेल्या काही दिवसापासून चर्चेचे गुऱ्हाळ सुरु होते. मात्र, शिवसेना तीन जागावर ठाम असल्याने याला यश आले नाही. अखेर शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज शिवसेनेच्या पॅनेलची घोषणा देखील केली.

शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयामुळे आघाडीत बिघाडी झाली. तर दुसऱ्या बाजूला भाजपने सत्ताधारी आघाडीसोबत राहणार असल्याचे जाहीर केले. भाजप व सहयोगी पक्षांना सन्मानजनक  पाच जागा दिल्यामुळे भाजप सत्ताधारी आघाडी सोबत राहणार असल्याची माहिती भाजपचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व माजी खासदार  धनंजय महाडिक व जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी सयुक्त प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवडणुकीत सत्ताधारी आघाडीमध्ये थेट चार उमेदवार आहेत. त्यामध्ये पतसंस्था गटातून भाजपचे सहयोगी सदस्य आमदार प्रकाश आवाडे व इतर मागासवर्गीय गटातून जनसुराज्य पक्षाचे विकास माने व प्रोसेसींग गटातून प्रदीप पाटील यांचा समावेश आहे. हातकणंगले सेवा संस्था गटातून माजी आमदार अमल महाडिक यांची बिनविरोध निवड झाली आहे. अशा चार जागांसह निवडणूक झाल्यानंतर स्वीकृत १ जागा अशा एकुण पाच जागा भाजप व सहयोगी पक्षांना  देण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजप या निवडणुकीत सत्ताधारी आघाडी सोबत राहणार आहे. या उमेदवारांसह सत्ताधारी आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भाजप या निवडणुकीमध्ये ताकतीने या आघाडीसोबत राहणार आहे. असेही पत्रकात त्यांनी म्हटले आहे

Web Title: BJP with ruling alliance in Kolhapur district central bank elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.