भाजपचा कोल्हापुरात जल्लोष,

By admin | Published: March 11, 2017 04:16 PM2017-03-11T16:16:02+5:302017-03-11T16:16:02+5:30

शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सव

BJP shakes hands at Kolhapur, | भाजपचा कोल्हापुरात जल्लोष,

भाजपचा कोल्हापुरात जल्लोष,

Next

भाजपचा कोल्हापुरात जल्लोष,
शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सव
कोल्हापूर : चार राज्यातील सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने यश मिळविल्याचे जाहीर होताच शनिवारी सकाळी कोल्हापूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या उत्साहला उधाण आले. येथील बिंदू चौक सबजेलजवळील भाजप कार्यालयात दूरचित्रवाहिनीवर निकाल ऐकण्यासाठी कार्यकर्ते सकाळी लवकरच हजर होते. जसजसे निकाल जाहीर होत गेले, तसतसे कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात धाव घेतली, आणि ढोल ताशांच्या गजरात नृत्य करुन जल्लोष केला. यावेळी त्यांनी शहरवासियांना जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा केला. या जल्लोषात पालकमंत्री तथा महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटीलही सहभागी झाले.
कोल्हापुरातील कार्यकर्त्यांना उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा या राज्यात भाजपची सत्ता येणार याची खात्री होती. त्यामुळे पक्ष कार्यालयात दूरचित्रवाहिनीसमोर बसलेल्या कार्यकर्त्यांना अपेक्षित निकाल सजमताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात निर्विवाद बहुमत मिळत असल्याचे पाहून सर्व कार्यकर्ते बिंदू चौक सबजेल येथील कार्यालयातून बाहेर पडले. हातात पक्षाचे ध्वज, गळ्यात स्कार्प आणि पक्षाची टोपी घातलेले कार्यकर्ते सकाळी साडे अकरा वाजता मध्यवर्ती शिवाजी चौकात पोहचले. ढोल ताशांचा गजर सुरु होताच कार्यकर्त्यांच्या या उत्साहाला अक्षरश: उधाण आले. कार्यकर्त्यांनी तालावर नृत्य करण्यास प्रारंभ केला. दरम्यान, महसुलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तेथे पोहचताच कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला. पाटील यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले. त्यानंतर पुष्पवृष्टी करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी चौकात जिलेबी वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीतच कार्यकर्त्यांनी नृत्य करीत जल्लोष सुरु केला. त्यामध्ये गोकुळचे संचालक बाबा देसाई, महानगर अध्यक्ष संदीप देसाई, माजी अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे महापालिकेतील गटनेते विजय सूर्यवंशी, नगरसेवक आशिष ढवळे, अजित ठाणेकर, संभाजी जाधव, विजय खाडे, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, गीता गुरव, जिल्हा परिषदेचे सदस्य अरुण इंगवले, माजी नगरसेविका प्रभा टिपुगडे, माणिक पाटील चुयेकर, सुरेश जरग, विजय जाधव, राहूल चिकोडे, अमोल पालोजी, अशोक देसाई, नजीर देसाई, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, वैशाली पसारे, भारती जोशी, आकुबाई जाधव आदी सहभागी झाले.
 

Web Title: BJP shakes hands at Kolhapur,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.