भाजप शेट्टींचा दाभोलकर करण्याच्या तयारीत : रविकांत तुपकर यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:57 AM2018-10-28T00:57:22+5:302018-10-28T01:02:42+5:30

भाजप सरकार खासदार राजू शेट्टी यांचा नरेंद्र दाभोलकर करण्याच्या तयारी आहे, असा खळबळजनक आरोप ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपणाला ही माहिती दिल्याचे सांगत शेट्टी सोडाच ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावलेल्या सामान्य कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर घरात घुसून मारू, असा इशाराही त्यांनी दिला.

BJP Shetti's Dabholkar is ready to do so: Ravikant Tupkar's allegations | भाजप शेट्टींचा दाभोलकर करण्याच्या तयारीत : रविकांत तुपकर यांचा आरोप

भाजप शेट्टींचा दाभोलकर करण्याच्या तयारीत : रविकांत तुपकर यांचा आरोप

googlenewsNext
ठळक मुद्देहिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनीच ‘हातकणंगले’मधून लढावेकार्यकर्त्यांना हात लावाल तर घरात घुसून मारु

जयसिंगपूर : भाजप सरकार खासदार राजू शेट्टी यांचा नरेंद्र दाभोलकर करण्याच्या तयारी आहे, असा खळबळजनक आरोप ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर आपणाला ही माहिती दिल्याचे सांगत शेट्टी सोडाच ‘स्वाभिमानी’चा बिल्ला लावलेल्या सामान्य कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर घरात घुसून मारू, असा इशाराही त्यांनी दिला. राजू शेट्टींना सांगलीतून लढण्याचे आव्हान देणाºयांनी शेट्टींसोबत ‘माढ्या’तून लढावे व मुख्यमंत्र्यांनीच ‘हातकणंगले’मधून लढावे, असे आव्हानही त्यांनी दिले.जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील १७ व्या ऊस परिषदेत तुपकर यांनी भाजप सरकारसह कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार हला चढविला.

तुपकर म्हणाले, शरद पवार व कॉँग्रेसच्या नादाला लागल्याचा आरोप काही मंडळी करीत आहेत; पण गेल्या १७ वर्षांत ‘स्वाभिमानी’च्या व्यासपीठावर एकही कॉँग्रेस-राष्टÑवादीचा नेता दिसला नाही. उलट शेट्टींचा धसका घेऊन मुख्यमंत्र्यांना कोल्हापुरात येऊन परिषद घ्यावी लागते, हा शेतकºयांचा विजय आहे. सत्ताधाºयांनी परिषद बोलवायची नसते, तर मुंबईत बसून निर्णय जाहीर करायचा असतो. मुख्यमंत्री साहेब तुमचे दिवस भरले असून, उलटी गिनती सुरू झाली आहे. भाजपच्या नेत्यांना आता रोजगार हमीच्या कामावर पाठविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. शेट्टींवर टीका करणाºयांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. वेळ आल्यानंतर एक-एक पुरावे बाहेर काढू. आतापर्यंत नुसते सांगलीतीलच बोललो. शेट्टींची कळ काढाल तर सगळ्या भानगडी बाहेर काढू, असा इशाराही त्यांनी सदाभाऊ खोत यांना दिला.

प्रा. जालंदर पाटील म्हणाले, शेट्टींना जातीयवादी म्हणणाºयांनी ‘हातकणंगले’चा इतिहास तपासावा. स्वर्गीय बाळासाहेब माने, रत्नाप्पाप्णा कुंभार यांनी तर गेली दहा वर्षे राजू शेट्टी यांनी नेतृत्व केले. खोत यांना एवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी ‘हातकणंगले’मधून निवडणूक लढवावीच, जनता कोणत्या बहुजनाच्या पाठीशी राहते, हे समजेल.

सावकार मादनाईक म्हणाले, अनेक साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील उर्वरित २00 रुपये दिलेले नाहीत, ते घेतल्याशिवाय उसाच्या कांड्याला हात लावू देऊ नका. शेतकºयांनी थोडा दम धरला तरच चार पैसे हातात पडतील. सयाजी मोरे यांनी उपस्थिांताना खेळवून ठेवले. शेतकरी सहसा कोणाच्या वाटेवर जात नाहीत; पण आमची कोणी वाटमारी केली तर त्यांची वाट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

भाऊंच्या पोस्टरला आसुडाचे फटके
‘स्वाभिमानी’च्या खेबवडे (ता. करवीर) येथील कार्यकर्त्यांनी सदाभाऊ ही फसवाफसवी बंद करा, अशा आशयाचे डिजिटल फलक करून आणले होते. त्यावर शेतकरी वैरण घालत आहे आणि त्याच गायीची सदाभाऊ धार काढत आहेत, असे चित्र होते. या डिजिटलला कार्यकर्त्यांनी परिषदेच्या ठिकाणी आसूडाचे फटकारे दिले.
 

खांदा निष्ठावंत आणि शिकारी जातिवंत हवा
मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील हे गद्दारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून वाघाची शिकार करायला निघाले आहेत; पण मुख्यमंत्री साहेब वाघाची शिकार करण्यासाठी खांदा निष्ठावंत व शिकारी जातिवंत लागतो, याचे भान ठेवावे, असे सयाजी मोरे यांनी सुनावले.
 

‘कष्टकरी’ परिषद नव्हे ‘गोपालकाला’
सदाभाऊ खोत यांच्या कोडोली येथील परिषदेची खिल्ली उडवत तुपकर म्हणाले, ही ‘कष्टकरी-शेतकºयांची परिषद नव्हती, तर तो ‘गोपालकाला’ होता. सदाभाऊंची परिषद, विनय कोरेंची माणसे आणि व्यासपीठावर बोलायला भाजपचे नेते, असा नुसताच ‘गोपालकाला’ होता.

ऊस परिषदेतील ठराव
मागील २०१७-१८ या हंगामातील एफआरपी थकविणाºया साखर कारखान्यांच्या संचालकांवर फौजदारी दाखल करा.
बॅँकांकडून साखरेवर ८५ ऐवजी ९० टक्के उचल द्यावी.
साखरेचा किमान विक्रीदर ३४०० रुपये करावा.
विना निकष दुष्काळ जाहीर करून भात, सोयाबीन, तूर, मका, उडीद व मुगाच्या आधारभूत किमतीवर खरेदी करण्यासाठी केंद्रे सुरू करा.
गाय दूध खरेदीवर अनुदान बंद न करता सहा महिने मुदतवाढ द्यावी.
यंत्रमागासाठी वीजदर व कर्जात ५ टक्के व्याजदर सवलत द्यावी.
मराठा, लिंगायत, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे.
 

शेट्टींना फुलांच्या पायघड्या
ऊस परिषदेच्या ठिकाणी आणण्यासाठी खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर, सावकार मादनाईक यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांना फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. क्रांती चौक ते सभास्थळापर्यंत फुलांचा सडा लक्ष वेधत होता.


श्रेय घेतले आता कुठे सापडत नाहीत...
गेल्या हंगामात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कारखानदारांसमवेत आमची बैठक घेऊन एफआरपी अधिक २०० रुपये जादा असा तोडगा काढला. तुम्ही काय हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचे होता म्हणून नव्हे, तर राज्यातील जबाबदार मंत्री म्हणून आम्हाला बोलविले म्हणून तुमच्या बैठकीला आम्ही आलो. हा तोडगा काढला म्हणून त्यांनी त्याचे श्रेय घेणारे डिजिटल तुम्ही साºया जिल्हाभर लावले; परंतु अनेक कारखान्यांनी ठरलेले जादाचे २०० रुपये अद्याप दिलेले नाहीत. त्यावेळी श्रेय घेणारे पालकमंत्री पाटील आता मात्र सापडायला तयार नाहीत. चंद्रकांतदादा, तुम्हाला ही जबाबदारी टाळता येणार नाही आणि गतवर्षीचा पै अन् पै आम्ही सोडणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.


जोरदार शक्तिप्रदर्शन
कोडोली (ता. पन्हाळा) येथील ‘रयत’च्या परिषदेत राज्यमंत्री खोत यांनी खासदार शेट्टी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे या ऊस परिषदेला शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावली होती. विक्रमसिंह मैदानासह गल्लीबोळ व कोल्हापूर-सांगली महामार्गावर गर्दी ओसंडून वाहत होती.
विधान परिषदेची डिपॉझिट शेट्टींच्या पैशांतून
आता राजू शेट्टींवर जातीयवादीचा आरोप करणाºया सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेचा फॉर्म भरण्यासाठी दिलेली डिपॉझिट ही शेट्टींच्या खिशातील होती. याची तरी जाणीव टीका करताना ठेवा, असे तुपकर यांनी सांगितले.

Web Title: BJP Shetti's Dabholkar is ready to do so: Ravikant Tupkar's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.