कोल्हापुरात भाजप-शिंदे गटाच्या खासदार-आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक
By समीर देशपांडे | Published: October 25, 2022 11:53 AM2022-10-25T11:53:25+5:302022-10-25T12:35:38+5:30
विविध महामंडळांवरील नियुक्ती, आगामी नगरपालिका पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि एकूणच राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित
कोल्हापूर : जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी आणि शिंदे गटाचे खासदार, आमदार यांची संयुक्त बैठक कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये सुरू झाली आहे. विविध महामंडळांवरील नियुक्ती, आगामी नगरपालिका पासून जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि एकूणच राजकीय परिस्थिती यावर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे.
पालकमंत्री दीपक केसरकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांच्यासह मान्यवर या बैठकीला उपस्थित आहेत. जिल्हा नियोजन समिती मधील निधी आणि महामंडळावरच्या नियुक्ती हे विषय प्राधान्याने चर्चेत येतील अशी अपेक्षा आहे.