भाजप-शिवसेना युतीला जिल्ह्यात सुरुंग

By admin | Published: October 29, 2016 12:10 AM2016-10-29T00:10:01+5:302016-10-29T00:20:08+5:30

नगरपालिका निवडणूक : भाजपची वेगवेगळी भूमिका; ‘जनसुराज्य‘ला प्राधान्य

BJP-Shiv Sena coalition alliance in the district | भाजप-शिवसेना युतीला जिल्ह्यात सुरुंग

भाजप-शिवसेना युतीला जिल्ह्यात सुरुंग

Next

कोल्हापूर : नगरपालिकांसाठी भाजप-शिवसेना युती असेल, या घोषणेला २४ तास उलटण्याआधीच कोल्हापूर जिल्ह्यात या युतीला सुरूंग लागल्याचे चित्र समोर आले आहे. दोनच दिवसांपूर्वी सत्तेत सहभागी झालेल्या ‘जनसुराज्य’ला प्राधान्य देत शिवसेनेला अनेक ठिकाणी भाजपने कट्ट्यावर बसविले आहे.
गुरुवारी संध्याकाळी मुंबईत घाईगडबडीने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी युतीची घोषणा केली होती; परंतु शुक्रवारी संध्याकाळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात जे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे, त्यातून त्यांनी दोन-तीन ठिकाणीच भाजप शिवसेनेसोबत असेल, असे संकेत दिले आहेत.
कुरुंदवाडला रामचंद्र डांगे भाजपमध्ये आले आहेत. तेच तेथील नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. त्यामुळे तेथे आता भाजप स्वबळावर लढणार आहे. मलकापूरला भाजपचे कार्यकर्ते आहेत; परंतु त्यांचा एकही नगरसेवक सध्या सभागृहात नाही. त्यामुळे तेथेही जनसुराज्य-भाजप युती होण्याची शक्यता असून, तेथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे.
वडगाव आणि पन्हाळा येथे भाजपने ‘जनसुराज्य’शी युतीचा निर्णय जाहीर केला आहे. जयसिंगपूर येथे महादेवराव महाडिक आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीत आणि इचलकरंजी येथील आमदार सुरेश हाळवणकर यांच्या सर्वपक्षीय आघाडीत भाजपचा समावेश असेल, तर कागल आणि मुरगूड येथील सर्वाधिकार नव्यानेच भाजपमध्ये दाखल झालेले शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांना देण्यात आले आहेत. या दोन्ही ठिकाणी शिवसेना म्हणून नव्हे, तर मंडलिक गट म्हणून ही युती होऊ शकते.
गडहिंग्लजबाबत चर्चा सुरूच आहे. तेथील निर्णय अजूनही झालेला नाही. भाजपने ज्या-त्या भागातील ताकदवान पक्षाबरोबर युतीचा निर्णय घेत अधिकाधिक ठिकाणी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.

Web Title: BJP-Shiv Sena coalition alliance in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.