भाजपने बांधावर जावे, शेतकरी पायातील हातात घेतील : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:20 AM2020-12-08T04:20:19+5:302020-12-08T04:20:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भूमिका शेतकरीविरोधी असून, हिंमत असेल तर भाजपच्या मंडळींनी बांधावर ...

BJP should go to the dam, farmers will take it in hand: Satej Patil | भाजपने बांधावर जावे, शेतकरी पायातील हातात घेतील : सतेज पाटील

भाजपने बांधावर जावे, शेतकरी पायातील हातात घेतील : सतेज पाटील

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भूमिका शेतकरीविरोधी असून, हिंमत असेल तर भाजपच्या मंडळींनी बांधावर जावे, शेतकरी पायातील हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

मंत्री पाटील म्हणाले, केंद्रातील भाजप सरकार शेतकऱ्यांचे हित करणार नाही, कायद्याच्या आडून वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. हिंमत असेल तर भाजपच्या नेत्यांनी बांधावर जाऊन दाखवावे, शेतकरी पायातील हातात घेतल्याशिवाय राहणार नाहीत.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गेले १२ दिवस दिल्ली, हरियाणातील शेतकरी थंडीत कुडकुडत आहेत. याबद्दल भाजपच्या नेत्यांना काहीच वाटत नाही. उलट कायदे रद्द होणार नसल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. कायदे रद्द होणार नाही, हे सांगणारे चंद्रकांत पाटील पंतप्रधान, केंद्रीय कृषिमंत्री आहेत का? त्यांनी आगीत तेल ओतू नयेत.

--------------------------------------------------------------

‘भारत बंद’ला महाविकास आघाडीचा पाठिंबा : हसन मुश्रीफ

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज, मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. कोल्हापूरच्या जनतेने सगळे व्यवहार बंद ठेवून शांततेत संपात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

Web Title: BJP should go to the dam, farmers will take it in hand: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.