जटिल, अवघड प्रश्न भाजपने सोडविले  : विनय सहस्रबुद्धे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 06:15 PM2019-09-27T18:15:33+5:302019-09-27T18:17:35+5:30

देशासमोर जे जटिल आणि अवघड प्रश्न होते, ते व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून सोडविण्यावर भाजपचा भर असल्याचा दावा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला आहे. केवळ घोषणा न करता अंमलबजावणी सुरू केल्यानेच मतदार पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

BJP solves complex, difficult question: Vinay Sahasrabuddhe | जटिल, अवघड प्रश्न भाजपने सोडविले  : विनय सहस्रबुद्धे

भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देजटिल, अवघड प्रश्न भाजपने सोडविले : विनय सहस्रबुद्धे‘करून दाखवल्या’ने मतदार पाठीशी

कोल्हापूर : देशासमोर जे जटिल आणि अवघड प्रश्न होते, ते व्यापक राष्ट्रहिताचा विचार करून सोडविण्यावर भाजपचा भर असल्याचा दावा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी केला आहे. केवळ घोषणा न करता अंमलबजावणी सुरू केल्यानेच मतदार पाठीशी असल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहस्रबुद्धे यांनी शुक्रवारी सकाळी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे उपस्थित होते.

सहस्रबुद्धे म्हणाले, दुसऱ्यांदा भारतीय जनतेने अभूतपूर्व असा जनादेश दिल्याने गेल्या १०० दिवसांमध्ये मोदी सरकारने एकापेक्षा एक गुुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले आहे. तिहेरी तलाक, ४७0 कलम रद्द यांसारख्या राज्यघटनेत नमूद केलेल्या विषयांवर निर्णय घेतलो. लोकप्रिय निर्णय न घेता लोकहिताचे, राष्ट्रहिताचे निर्णय घेतले. नावात राष्ट्रवादी असणाऱ्या पक्षालाही ३७० कलमावर ठोस भूमिका घेता आली नाही.

पेट्रोलियम पदार्र्थाांंचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरविले जातात. स्वच्छ भारत, गॅस अनुदान सोडण्याचे आवाहन, प्लास्टिकबंदी असे अनेक विषय या सरकारने पुढे आणले. ज्या विषयावर कोणीही फारशी उघड भूमिका घेत नाहीत, त्या लोकसंख्येच्या प्रश्नालाही नरेंद्र मोदी यांनी हात घातला.

आर्थिक मंदीमुळे गडबडून न जाता त्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या. अमेरिकेच्या इतिहासात भारतीय पंतप्रधानांचा एवढा भव्य-दिव्य कार्यक्रम होणे हे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये भारताचा दबदबा वाढत असल्याचे द्योतक आहे. हे सर्व काम जनता बघत आहे. कामावर आधारित असा जनादेश आम्ही महाराष्ट्रातही मागत आहोत. जनता स्पष्टपणे तो भाजपला देईल , असा विश्वास सहस्रबुद्धे यांनी यावेळी व्यक्त केला.

एन. डी. पाटील यांची घेतली भेट

खासदार सहस्रबुद्धे यांनी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांची रुग्णालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. सुभाष वोरा हेदेखील दवाखान्यात असून त्यांच्याही प्रकृतीची चौकशी सहस्रबुद्धे यांनी केली.
 

 

Web Title: BJP solves complex, difficult question: Vinay Sahasrabuddhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.