बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस, शिवसैनिकांनी सावध रहावे; चंद्रकांत पाटीलांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:29 PM2022-03-23T15:29:52+5:302022-03-23T15:38:12+5:30

कोल्हापूर : ‘उत्तर’ची जागा बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे आणि दुर्देवाने शिवसेनेला त्यांना पाठिंबा द्यावा लागला आहे. ...

BJP state president Chandrakant Patil criticizes Guardian Minister Satej Patil | बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस, शिवसैनिकांनी सावध रहावे; चंद्रकांत पाटीलांचा हल्लाबोल

बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस, शिवसैनिकांनी सावध रहावे; चंद्रकांत पाटीलांचा हल्लाबोल

Next

कोल्हापूर : ‘उत्तर’ची जागा बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवली जात आहे आणि दुर्देवाने शिवसेनेला त्यांना पाठिंबा द्यावा लागला आहे. बंटी पाटील हा माणसं खाणारा माणूस असल्यामुळे शिवसैनिकांनी सावध रहावे अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर हल्ला चढवला.

भाजपचे ‘उत्तर’चे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जंगी मिरवणुकीने कदम यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्यासह भाजप, जनसुराज्य, ताराराणी आघाडी, आरपीआय आठवले गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, कोल्हापूर शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किंमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता. त्याची तुम्ही पावती फाडलीत परंतू भाजपने ४७३ कोटी रूपये भरून टोल घालवला. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरसाठी काय केले आणि आम्ही काय केले याचा बिंदू चौकात एकदा सामना होवू जावू दे असे आव्हानही त्यांनी सतेज पाटील यांना दिले. यावेळी धनंजय महाडिक, प्रकाश आवाडे यांनीही सतेज पाटील यांच्या टीकास्त्र सोडले.

Web Title: BJP state president Chandrakant Patil criticizes Guardian Minister Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.