‘भाजप-ताराराणी’चे उमेदवार जाहीर--‘मातोश्री’वरून यादीची होणार घोषणा
By admin | Published: September 30, 2015 01:06 AM2015-09-30T01:06:43+5:302015-09-30T01:07:39+5:30
दुसरी यादी ४१ जणांची : संभाजी जाधव यांचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी भाजप, ताराराणी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाइं (आठवले गट) या महायुतीने मंगळवारी ४१ जणांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक, गटनेते संभाजी जाधव यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत ‘कमळ’ हातात घेतले. भाजपकडून आर. डी. पाटील हे शिवाजी उद्यमनगरमधून, तर कनाननगरमधून सुनील मोदी रिंगणात उतरणार आहेत. माजी महापौर नंदकुमार वळंजू यांना ताराराणी आघाडीकडून शास्त्रीनगर-जवाहरनगरातून उमेदवारी मिळाली.
भाजप-ताराराणी आघाडीने २१ जणांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये भाजप व ताराराणी प्रत्येकी दहा, तर स्वाभिमानी पक्षाला एक जागा दिली होती. दुसऱ्या यादीत सुनील मोदी, आशिष ढवळे, विजय सूर्यवंशी, संगीता सावंत, नंदकुमार वळंजू, उषा जाधव, नंदकुमार गुर्जर या सात माजी नगरसेवकांचा समावेश आहे. माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांची कन्या सुमैय्या मुल्ला यादवनगरातून, विद्यमान नगरसेवक सतीश घोरपडे यांच्या पत्नी सविता घोरपडे या सुभाषनगर प्रभागातून ताराराणी आघाडीकडून लढणार आहेत. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीला कंटाळून संभाजी जाधव यांनी भाजपकडून तर नगरसेवक सत्यजित कदम यांच्या भावजय सीमा शशिकांत कदम या महाडिक वसाहतमधून लढणार आहेत.
भाजपचे उमेदवार-
प्र. क्र.प्रभागाचे नावआरक्षणउमेदवार
१५कनाननगरखुलासुनील जबरचंद मोदी
१६शिवाजी पार्कखुलाआशिष मनोहर ढवळे
३४शिवाजी उद्यमनगरओ. बी. सी.आर. डी. पाटील
३८टाकाळा, माळी कॉलनीखुला महिलासविता शशिकांत भालकर
४२पांजरपोळखुला महिलाभाग्यश्री उदय शेटके
४४मंगेशकरनगरओ. बी. सीविजय दिनकर सूर्यवंशी
४५कैलासगडची स्वारीखुलासंभाजी रमेश जाधव
५०पंचगंगा तालीमखुला महिलावैशाली सतीश पाटील
५१लक्षतीर्थ वसाहतखुला महिला शिवानी संजय पाटील
५८संभाजीनगर अनुसूचित जातीसंतोष बाळासो गायकवाड
५९नेहरूनगर अनुसूचित जाती, महिलाअश्विनी अरुण बारामते
६३सम्राटनगरखुला महिलाजयश्री चंद्रकांत जाधव
७२फुलेवाडी खुला महिलारचना राजू मोरे
७३फुलेवाडी रिंगरोड अनुसूचित जाती, महिलामीनाक्षी सुरेश मिस्त्री
७४सानेगुरुजी वसाहतओ. बी. सी. महिलामनीषा अविनाश कुंभार
७५आपटेनगर-तुळजाभवानीखुलासंजीवनी विश्वनाथ शेटे
७९सुर्वेनगरखुला महिलासुप्रिया सुनील वाडकर
८०कणेरकर, क्रांतिसिंहनगरअनुसूचित जाती, महिलानूतन राजेंद्र सरनाईक
८१जिवबा नाना पार्क अनुसूचित जाती संतोष जयसिंग जाधव
रिपाइं-
६०जवाहरनगरअनुसूचित जाती (खुला)नंदकुमार श्रीराम गुर्जर
ताराराणी आघाडी -
४बावडा लाईन बझारखुला महिलासंजना संदीप जाधव
६पोलीस लाईन ओ. बी. सी. महिलासंगीता नामदेव बिरंजे
१७सदर बाजार खुला महिलास्मिता मारुती माने
१८महाडिक वसाहत खुला महिलासीमा शशिकांत कदम
२०रा. छ. शाहू मार्केट यार्ड खुला महिलावर्षा दत्तात्रय कुंभार
२१ टेंबलाईवाडीअनुसूचित जाती कमलाकर यशवंत भोपळे
२२ विक्रमनगरअनुसूचित जाती महिलापल्लवी रामदास जाधव
२६कॉमर्स कॉलेज खुला महिलागुलराज गुलाब बागवान
२८सिध्दार्थनगर ओ. बी. सी.लईक रफिक पिरजादे
३१बाजारगेटओ. बी. सी. महिला प्रणाली विक्रम मोतीपुरे
३५यादवनगरओ. बी. सी. महिलासुमैय्या रफिक मुल्ला
४१प्रतिभानगरखुला महिलाकविता अनिल पाटगावकर
४३शास्त्रीनगर-जवाहरनगरओ. बी. सी.नंदकुमार आनंदराव वळंजू
४६सिद्धाळा गार्डनखुला महिलासुनंदा सुनील मोहिते
५२बलराम कॉलनीखुलागणेश रमेश खाडे
५४चंद्रेश्वरखुला महिला प्रियांका निशिकांत इंगवले
६१सुभाषनगरओ. बी.सी. महिलासविता सतीश घोरपडे
६२बुद्ध गार्डनखुला महिलाउषा मोहन जाधव
६६स्वातंत्र्यसैनिक कॉलनीखुला महिला रूपा संग्रामसिंह निकम
स्वाभिमानी शेतकरी संघटना-
२क।। बावडा - पूर्व बाजू खुलारूपेश बाबूराव पाटील
जाधव कुटुंबात दोघे
संभाजी जाधव हे कैलासगडची स्वारी प्रभागातून भाजपतर्फे निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या भावजय जयश्री चंद्रकांत जाधव या सम्राटनगरमधून रिंगणात उतरल्या आहेत.
बाप-लेक रिंगणात
भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील हे शिवाजी उद्यमनगर येथून रिंगणात उतरले आहेत; तर त्यांची कन्या श्रुती पाटील या महालक्ष्मी प्रभागातून नशीब अजमावीत आहेत.
उर्वरित यादी दोन दिवसांत
भाजप-ताराराणी आघाडीने दोन टप्प्यांत ६२ उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. उर्वरित १९ जणांची यादी येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहिती भाजप महानगराध्यक्ष महेश जाधव व ताराराणी पक्षाचे अध्यक्ष स्वरूप महाडिक यांनी दिली.
‘रिपब्लिकन’ ला एक जागा
रिपब्लिकन आठवले गटातून जवाहरनगर प्रभागातून माजी नगरसेवक नंदकुमार गुर्जर यांना उमेदवारी दिली आहे.
सेनेची पहिली यादी आज; ४१ उमेदवारांचा समावेश
‘मातोश्री’वरून यादीची होणार घोषणा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठीची शिवसेना उमेदवारांची पहिली यादी आज, बुधवारी जाहीर होणार आहे. त्यात ४१ उमेदवारांचा समावेश असून ‘मातोश्री’वरून यादीची सकाळी अकरा वाजता घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महानगरपालिकेच्या निवडणूक शिवसेनेतून लढण्यासाठी प्रभागांतील इच्छुकांची संख्या अधिक आहे. ८१ जागांसाठी शिवसेनेकडे सुमारे साडेचारशे इच्छुकांचे अर्ज दाखल झाले होते. त्यानंतर प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती आणि सर्व्हेच्या माध्यमातून काही उमेदवारांची आमदार राजेश क्षीरसागर व जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी निवड केली. उमेदवारांच्या यादीबाबत मुंबईतील सेना भवनात मंगळवारी दुपारी साडेचार वाजता बैठक सुरू झाली. त्यात सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हा प्रमुख संजय पवार यांची उमेदवारांच्या निवडीबाबत चर्चा झाली. चार तासांहून अधिक चाललेल्या बैठकीत अखेर पहिल्या टप्प्यातील ४१ उमेदवारांच्या निवडीवर एकमत झाले. त्यानुसार संबंधित यादी सेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या संमतीसाठी ‘मातोश्री’ वर पाठविण्यात आली आहे. त्यांच्या संमतीनंतर बुधवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत सेनेच्या पहिल्या यादीची घोषणा ‘मातोश्री’वरून होेईल. त्यानंतर उर्वरीत ४० उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारपर्यंत (दि. ६ आॅक्टोबर) जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)