पन्हाळा येथे चुरशीच्या निवडणुकीत भाजपा, आघाडीवर
By admin | Published: February 23, 2017 07:31 PM2017-02-23T19:31:04+5:302017-02-23T19:31:04+5:30
कोतोली गटात शिवसनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांना मोठा धक्का
पन्हाळा : जिल्हा परिषद मतदारसंघात अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणूकीत नरके व पाटील गटाचा सुपडासाप झाला तर जिल्हा परिषद गटात जनसुराज्यचे मताधिक्य घटले तर शिवसेना-भाजपाने आघाडी घेतली.यात जनसुराज्य पक्षाला तीन,भारतीय जनता पक्षाला एक,शिवसेनेला एक,राष्ट्रवादी पक्षाला एक असे बलाबल झाले. जिल्हा परिषद गटाची मतमोजणी नगरपालिकेच्या सांस्कृतिक सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी अजय पवार यांच्या देखरेखीखाली सुरु झाली.२४ टेबल वर म्हणजे जिल्हा परिषदेचे सहा व पंचायत समितीचे बारा गणाची मतमोजणी दुपारी बारा वाजता पूर्ण झाली.पण बहुतेक ठिकाणी कमी मताधिक्य असल्याने फेरमतमोजणी केली यात कोतोली गटातून जनसुराज्यचे शंकर किसन पाटील हे शिवसेनेचे अजित नरके यांच्यापेक्षा १८९ मताने विजयी झाले तर युवलूज गणात भारतीय जनता पक्षाच्या सौ.कल्पना केरबा चौगुले या शिवसेनेच्या सौ.संगीता पांडुरंग काशीद यांच्यापेक्षा ६४ मतांनी विजयी झाल्या.बाजारभोगाव पंचायत समिती गणातील जनसुराज्यचे नितीन शामराव पाटील यांच्या पेक्षा शिवसेनेचे प्रकाश दत्तात्रय पाटील हे अवघ्या १ मताने विजयी झाले.फेरमतमोजणी मुळे सर्वच उमेदवारांचा निकाल राखून ठेवला हा निकाल सायंकाळी सहा वाजता जाहीर केला. संपूर्ण पन्हाळा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या अटीतटीच्या आणि चुरशीच्या सातवे जिल्हा परिषद गणात कांग्रेसचे अमरसिंह यशवंत पाटील व जनसुराज्यचे शिवाजीराव आकाराम मोरे यांच्या लढतीत जनसुराज्यचे शिवाजी आकाराम मोरे यांना १३७१३ मते पडली तर अमर पाटील यांना १२५९३ मते पडली यामध्ये मोरे ११२० मताने विजयी झाले.कोडोली जिल्हा परिषद गणामध्ये जनसुराज्यच्या अपेक्षित निकाल लागला असून विशांत सुरेश महापुरे यांना १२१९६ मते मिळाली तर विरोधी कांग्रेसचे भीमराव साठे यांना ६४१७ मते पडली यामध्ये ५७७९ मते महापुरे यांना मिळून ते विजयी झाले.सुरुवाती पासून पोर्ले तर्फे ठाणे या गटात सर्व राजकीय नेत्यांनी लक्ष घातलेल्या गणात प्रियांका संपत पाटील हिने अपेक्षित यश मिळवून या ठिकाणी जनसुराज्यची पारंपरिक जागा आपणाकडे खेचण्यास यश मिळविले.प्रियांका यास १४३९४ मते तर समृध्दी सचिन पाटील (जनसुराज्य) यांना १२०१६ मते मिळाली याठिकाणी २३७८ मते मिळवून प्रियांका पाटील विजयी झाल्या.कळे गटात कांग्रेसचे संदीप अरुण नरके यांना ६६५५ मते मिळाली तर शिवसेनेचे सजेर्राव ज्ञानदेव पाटील यांना १०३७३ मते मिळाली याच ठिकाणी जनसुराज्यचे युवराज बेलेकर यांनी ९१८३ मते घेतली यामध्ये शिवसेनेचे सजेर्राव पाटील ११९० मते मिळवून विजयी झाले.यवलूज गटात या ठिकाणी भाजपाने जनसुराज्य पक्षाशी मैत्रीपूर्ण लढत दिली भाजपाच्या कल्पना केरबा चौगुले यांना ८४४० मते विरोधी शिवसनेच्या संगीता पांडुरंग काशीद यांना ८३७५ मते मिळाली फेर मोजणीत यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सौ.कल्पना केरबा चौगुले ह्या अवघ्या ६५ मतांनी विजयी झाल्या.याठिकाणी शिवसनेच्या सौ.संगीता पांडुरंग काशीद यांनी जोरदार लढत दिली.कोतोली गटात शिवसनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू अजित नरके यांना मोठा धक्का बसून याठिकाणी जनसुराज्यचे शंकर किसन पाटील हे १८९ मतांनी विजयी झाले. (प्रतिनिधी)