संघटनेत फू ट पाडणे भाजपला अशक्य
By admin | Published: February 19, 2017 12:23 AM2017-02-19T00:23:12+5:302017-02-19T00:23:12+5:30
राजू शेट्टी : दुधगावला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रचार
सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत फू ट पाडण्यासारखा हातोडा अद्याप तयार झालेला नाही. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गळ्यात मफ लर घातला तरी, त्यांच्या छातीवर संघटनेचा बिल्ला होता, त्यामुळे भाजपने संघटनेत फू ट पाडण्याचे स्वप्न पाहू नये, अशी टीका खा. राजू शेट्टी यांनी केली. कवठेपिरान जिल्हा परिषद गटात स्वाभिमानीचा उमेदवारच निवडून येणार येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दुधगाव (ता. मिरज) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या उमेदवार श्रीमती सुरेखा अण्णासाहेब आडमुठे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शेट्टी बोलत होते. यावेळी अर्जुन वडगावे, पिराजी माळी, प्रकाश मगदूम यांची प्रुमख उपस्थिती होती.
शेट्टी म्हणाले की, संघटनेचे नेते व कृषी राज्यमंत्री खोत राज्य सरकारमधील मंत्री आहेत. मुख्यमंत्री आल्याने ते कार्यक्रमासाठी गेले होते. सदाभाऊ आणि मी गेल्या पंचवीस वर्षांपासून संघर्ष करीत आलो आहे. एका क्षणात संघटनेत फू ट पाडण्याचा प्रयत्न करण्याचा काहींचा डाव असला तरी, ती स्वप्ने भाजपने पाहू नयेत. मी आमदार झाल्यानंतर संघटना जिल्ह्यात पोहोचली आणि खासदार झाल्यानंतर संपूर्ण देशभर पोहोचली.
मागील दोनवेळच्या लोकसभा निवडणुकीत दुधगाव परिसर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला आहे. या परिसरात संघटनेची ताकद वाढली आहे. त्याचा उपयोग कार्यकर्त्यांना नक्की होणार असल्याने जिल्हा परिषद निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठीशी रहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बाबासाहेब सांदे्र, बंडू कागवाडे, पिंटू लटपटे, पिराजी माळी, शीतल तामगावे, भरत साजणे, सागर आडमुठे, सनी गडगे, पंचायत समितीच्या उमेदवार जयश्री डांगे, तुंगच्या माजी सरपंच कल्पना पाटील, संगीता गुरव उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पुढील वर्षापर्यंत : कर्जमाफ ी
शेतीचे उत्पादन वाढते, मात्र सरकारकडून दर मिळत नाही. शेतकरी अडचणीतून वाटचाल करीत आहे, परंतु सरकार वेळकाढूपणाची भूमिका स्वीकारत असल्याचे दिसते. पुढील वर्षापर्यंत कर्जमाफीसाठी पाठपुरावा करणार असून, त्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे खा. राजू शेट्टी यांनी सांगितले. शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास सध्याच्या सरकारची मागील सरकारसारखी स्थिती होईल, असा इशाराही त्यांनी दिला.