Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 10:55 AM2022-04-22T10:55:25+5:302022-04-22T10:56:04+5:30

५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला.

BJP was formed before human beings were born on earth, Criticism of Jayant Patel | Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

Jayant Patil: पृथ्वीवर मानव जन्माला यायच्या आधीच 'भाजप'ची स्थापना, जयंत पाटलांनी उडवली खिल्ली

googlenewsNext

कोल्हापूर : भाजप हा इतका जुना पक्ष आहे की पृथ्वीतलावर मानव जन्माला यायच्या आधीच त्याची स्थापना झाली होती असे जरी म्हटले तरी आम्हाला काही हरकत नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची खिल्ली उडवली. ५० वर्षात तीन वेळा पक्षाची नावे बदलणाऱ्यांकडून यापेक्षा दुसरा कोणता विनोद घडूच शकत नाही, त्यांच्या या बोलण्याला आमचा पाठिंबाच असेल असा चिमटाही काढला.

राष्ट्रवादी परिवार संवादयात्रेच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या जयंत पाटील यांच्याशी गुरुवारी संध्याकाळी पत्रकारांनी संवाद साधला. भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपला पाच हजार वर्षांपूर्वीची परंपरा असल्याच्या केलेल्या वक्तव्यावर विचारणा केली असता त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. ते म्हणाले, भाजपचा जन्म होऊन ५० वर्षेदेखील झालेली नाहीत.

या काळात त्यांच्या पक्षाने तीन वेळा नावे बदलली, तीन स्थित्यंतरे पक्षाने पाहिली आहेत. काँग्रेसचे मात्र नाव कधीच बदलले नाही. ज्यांना स्वत:चाच इतिहास माहीत नाही त्यांनी १० हजार वर्षांपूर्वी असे म्हटले तरी काही फरक पडत नाही. लोकांचे मात्र चांगले मनोरंजन होते, त्यामुळे अशी वक्तव्ये करत राहा, आमचा कायमच पाठिंबा राहील.

दादांना विश्रांतीची गरज

चंद्रकांत पाटील हे काहीही बाेलत राहतात, त्यांचे बोलणे आता किती गांभिर्याने घ्यायचे हेच बघावे लागणार आहे. त्यांना आता थोडी विश्रांती घ्यावी, कोल्हापूरकरांनी उत्तरच्या निवडणुकीत त्यांना हेच सांगितले आहे, आता ते किती मनावर घेतात, ते बघुया अशीही टीपणी पाटील यांनी केली.

ब्राह्मण समाजाची दिलगिरी

आमदार अमोल मिटकरी यांनी सांगलीतील सभेत केलेले वक्तव्य हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे, पक्षाचे नाही. त्यांचे हे वाक्य मलाही अनपेक्षितच असल्यानेच मी भाषण थांबवण्याची सूचना केली, ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा आमचा हेतू पूर्वीही नव्हता, कधी असणार नाही, झाले ते चुकीचे होते, मी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, समाजाने गैरसमज करून घेऊ नये, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

Web Title: BJP was formed before human beings were born on earth, Criticism of Jayant Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.