राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येईल :शौमिका महाडिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 10:38 AM2020-10-22T10:38:33+5:302020-10-22T10:41:01+5:30

Bjp, Politics, kolhapur सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार कार्यरत आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येईल असा आशावाद भाजप महिला आघाडी मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.

BJP will return to power in the state: Shaumika Mahadik | राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येईल :शौमिका महाडिक

राज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येईल :शौमिका महाडिक

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात पुन्हा भाजप सत्तेवर येईल :शौमिका महाडिकभाजप महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर

कोल्हापूर : सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार कार्यरत आहेत. मात्र पुन्हा एकदा राज्यात भाजपची सत्ता येईल असा आशावाद भाजप महिला आघाडी मोर्चाच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी व्यक्त केला.

जिल्हा महिला कार्यकारिणीची घोषणा आणि विविध कर्तबगार महिलांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे होत्या. यावेळी पोलिस उपअधिक्षक पदमा कदम, पुष्पा पाटील, प्रिया दंडगे, स्मृती खांडेकर, सरिता रानगे, दाक्षियनी जाधव, अमृता कोंदाडे, स्मृती गवळी, अनिता कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

नीता माने,  सोनाली पाटील (सरचिटणीस), अश्विनी कबुडगे, उज्वला बरगाले, जयश्री तेली, माया लिंग्रज्, सुलोचना नार्वेकर, पुष्पा पाटील (उपाध्यक्ष), रेश्मा सनदी, निलोफर खतीब, ऋतुजा गोंधळी, मेघाराणी जाधव, संध्या महाजन(चिटणीस) या प्रमुख पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली.

एकाच शहरात, दोन कार्यक्रम

दरम्यान भाजपच्या शहर आणि ग्रामीण महिला मोर्चाच्यावतीने कोल्हापुरात दोन ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा सुरू होती. शहरच्यावतीने बिंदू चौकातील भाजप कार्यालयात तर ग्रामीणच्यावतीने येथील एका हाटेलमध्ये कार्यक्रम घेण्यात आला होता. शहरच्या कार्यक्रमास राहूल चिकोडे प्रमुख उपस्थिती होती तर ग्रामीणचा कार्यक्रम शौमिका महाडिक यांनी आयोजित केला होता. दोन्ही ठिकाणी प्रदेशाध्यक्षांना हजेरी लावावी लागली.
 

Web Title: BJP will return to power in the state: Shaumika Mahadik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.