देश उद्योगपतींच्या घशात घालणे हेच भाजपचे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:55+5:302021-03-13T04:44:55+5:30

भोगावती : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना आणि भारतीय जनतेला भिकेला लाऊन उद्योगपतींना श्रीमंत करण्याचा एककलमी कर्यक्रम सुरू ...

BJP's job is to put the country in the throats of industrialists | देश उद्योगपतींच्या घशात घालणे हेच भाजपचे काम

देश उद्योगपतींच्या घशात घालणे हेच भाजपचे काम

Next

भोगावती : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकऱ्यांना आणि भारतीय जनतेला भिकेला लाऊन उद्योगपतींना श्रीमंत करण्याचा एककलमी कर्यक्रम सुरू केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शांत बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी दिला आहे.

राधानगरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने घरगुती गॅस आणि पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात भोगावती येथे जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील आणि तालुका अध्यक्ष किसन चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली.

ए. वाय. पाटील म्हणाले, घरगुती गॅस ८५० चा आकडा पार करून पुढे गेला आहे. पेट्रोल शंभरवर गेले आहे. त्यामुळे महागाई वाढली आहे. सामान्य लोकांना जगणेदेखील मुश्कील झाले आहे. भाजप यावर काही बोलायला तयार नाही. इंधनाचे दर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आम्ही जिल्ह्याभर आंदोलन करणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जयसिंग हुजरे, जि. प. सदस्य विनय पाटील, प्रा. किसन चौगले यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राधानगरी पं. स. सभापती वंदना हळदे, शिवाजी पाटील, माजी सभापती दीपाली पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक फिरोजखान पाटील, माजी संचालक अविनाश पाटील, ‘बिद्री’चे संचालक नेताजी पाटील, सर्जेराव पाटील, भिकाजी एकल, दीपक पाटील, आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी संचालक राजू कवडे यांनी आभार मानले.

फोटो ओळी : भोगावती येथे पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा निषेध फलक लाऊन केंद्र सरकारच्या विरोधी निदर्शने करण्यात आली त्यावेळी मार्गदर्शन करताना ए. वाय. पाटील, यावेळी प्रा. किसन चौगले, राजू कवडे, नेताजी पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: BJP's job is to put the country in the throats of industrialists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.