भाजपच्या सेवा सप्ताहास प्रारंभ, रूग्णालये-वस्त्यांमध्ये फळे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 02:48 PM2020-09-15T14:48:15+5:302020-09-15T14:52:17+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगर भाजपतर्फे सेवा सप्ताह उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

BJP's service week begins with distribution of fruits in hospitals and slums | भाजपच्या सेवा सप्ताहास प्रारंभ, रूग्णालये-वस्त्यांमध्ये फळे वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजपतर्फे राहुल चिकोडे, महेश जाधव यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.

Next
ठळक मुद्देभाजपच्या सेवा सप्ताहास प्रारंभ रूग्णालये, वस्त्यांमध्ये फळे वाटप

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महानगर भाजपतर्फे सेवा सप्ताह उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी रुग्णालये व गरीब वस्त्यांमध्ये फळे वाटून या सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रसूृती वॉर्डमधील महिलांना फळांचे वितरण करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रकाश पवार यांनी आभार मानले. राहुल चिकोडे म्हणाले, संपूर्ण देशभरात भाजप कार्यकर्ते सेवा सप्ताहाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत मोदी यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत.

शिवाजी पेठ मंडलामध्ये अंबाई टँक परिसरातील माजगांवकर मळा याठिकाणी फळे वितरण करण्यात आली. याठिकाणी जिल्हा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये, जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, भाजपा गटनेते अजित ठाणेकर उपस्थित होते.

मंगळवार पेठ मंडलामध्ये बाल संकुल येथील विद्यार्थ्यांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी मंडल अध्यक्ष संतोष माळी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, विजय सूर्यवंशी, किरण नकाते, संभाजी जाधव, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, प्रमोदिनी हार्डिकर उपस्थित होते.

शाहूपुरी मंडलाच्यावतीने रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले. यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, उमा इंगळे, मंडल अध्यक्ष प्रग्नेश हमलाई, तर उत्तरेश्वर पेठ मंडलाच्यावतीने पंचगंगा हॉस्पिटल येथे रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले.

यावेळी मंडल अध्यक्ष भरत काळे उपस्थित होते. कसबा बावडा मंडलामध्ये सेवा रुग्णालयात रुग्णांना फळे वितरित करण्यात आलीत. यावेळी मंडल अध्यक्ष डॉ. राजवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे उपस्थित होते.

 

Web Title: BJP's service week begins with distribution of fruits in hospitals and slums

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.