शिवसेना संपवण्याचे भाजपचे षङ्यंत्र

By admin | Published: October 1, 2014 01:05 AM2014-10-01T01:05:17+5:302014-10-01T01:05:17+5:30

दिवाकर रावते : बहुजन समाजच भाजपला संपवेल

BJP's strategy to end Shiv Sena | शिवसेना संपवण्याचे भाजपचे षङ्यंत्र

शिवसेना संपवण्याचे भाजपचे षङ्यंत्र

Next

सांगली/मिरज : देशातील भ्रष्ट काँग्रेस सरकार हटवण्यासाठी तुम्ही, आम्ही सर्व बहुजन समाजाने भाजपला साथ दिली़, पण आता मराठी जनतेची अस्मिता असलेली शिवसेनाच संपवायला भाजप निघाल्यामुळे त्यांना मतदारच मतदानातून त्यांची जागा दाखवून देतील, अशी टीका शिवसेना संपर्कप्रमुख आमदार दिवाकर रावते यांनी केली़
सांगली, मिरज शहरात रावते यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली़ यावेळी ते बोलत होते़ आमदार संभाजी पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते़ रावते म्हणाले, शिवसेनेशी युती तोडून भाजपने हिंदुत्वाची नाळ तोडली आहे. मात्र आम्ही सत्तेसाठी जन्माला आलो नसल्याने हिंदुत्व सोडणार नाही. मोदींना दिल्लीला पाठविण्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा होता. राज्यात आम्हाला अर्धा भगवा नव्हे, तर पूर्ण भगवा फडकवायचा आहे.
धनशक्ती विरुध्द शिवसेनेची श्रमशक्ती अशा लढाईत शिवसेनेची सरशी होईल़ भाजपला नव्हे, तर मोदींना देशातील भ्रष्ट सरकार उलथून टाकण्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली़
पण, सध्या भाजपला महाराष्ट्र बळकावण्याची घाई झाल्याची टीकाही त्यांनी केली़ संभाजी पवार म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाल्यानंतर बहुजन समाजमुक्त भाजप करण्याचा सध्याच्या नेत्यांचा निश्चय दिसत आहे़
यावेळी पृथ्वीराज पवार, नगरसवेक गौतम पवार यांनीही भाजपमधील गटबाजीवर जोरदार टीका केली़ यावेळी जिल्हाप्रमुख विकास सूर्यवंशी, शिवराज बोळाज, हरिपूरच्या सरपंच कविता बोंद्रे, अजिंक्य पाटील, तानाजी सातपुते, विकास कोल्हटकर, सुवर्णा मोहिते, आनंद रजपूत, अमोल पाटील, नंदू गौड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक आदी उपस्थित होते. विशाल पवार यांनी स्वागत केली़ (प्रतिनिधी)
शहीद भगतसिंगांचे क्रांतिकार्य अतुलनीय
रवींद्र मोकाशी : निवारा बांधकाम कामगार संघटनेचा मेळावा
सांगली : शहीद भगतसिंगांनी देशासाठी केलेले क्रांतिकार्य अतुलनीय असेच होते. त्यांनी व्यक्त केलेले विचार भारतीयांनी समजून त्यावर चिंतन केले पाहिजे, असे मत अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोकाशी यांनी व्यक्त केले. निवारा बांधकाम कामगार संघटनेतर्फे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
शहीद भगतसिंगांच्या जयंतीनिमित्त संघटनेच्या कार्यालयात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मोकाशी म्हणाले, भगतसिंग यांनी तरुण वयातच क्रांतिकारक म्हणून कार्यास प्रारंभ केला. स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ सेनानी लाला लजपतराय यांच्यावर इंग्रजांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी क्रांतिकार्यात उडी घेतली. इंग्रज शासनाने त्यांच्या कार्यकाळात कामगार विरोधी बिल आणले होते.
याव्दारे कामगारांना आंदोलन तसेच संप करण्यावर बंदी घालण्यात आली होती. याच्या निषेधार्थ भगतसिंग यांनी असेंब्लीमध्ये कोणतीही जीवितहानी होणार नाही अशारितीने मोठ्या आवाजाचे बॉम्ब फेकले होते. जेणेकरून कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने इंग्रजांना कामगारांचे म्हणणे ऐकू येईल, असा त्यामागचा उद्देश होता. कित्येक वर्षे इंग्रज सरकार भगतसिंगांना अटक करू शकलेले नव्हते.
कार्यक्रमास संघटनेचे अध्यक्ष शंकर पुजारी, विजय बचाटे, बाळासाहेब दिवाणजी, सुमन पुजारी, वर्षा गडची, शशिकांत शिंदे, बाळासोा कोल्हे आदींसह जिल्ह्यातील कामगार उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's strategy to end Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.