हातकणंगले तालुक्यातील भाजपाची विजयी वाटचाल

By admin | Published: February 23, 2017 08:18 PM2017-02-23T20:18:32+5:302017-02-23T20:18:32+5:30

तालुक्यात प्रथमच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खाते उघडले गतवेळी चार जागा जिंकणारी काँग्रेस या वेळी भुईसपाट

BJP's victory in Hatkanangle taluka | हातकणंगले तालुक्यातील भाजपाची विजयी वाटचाल

हातकणंगले तालुक्यातील भाजपाची विजयी वाटचाल

Next

हातकणंगले : --- हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद मतदारसंघमध्ये मोठ्या राजकीय उलथापालथी होऊन सर्वाधिक जागा मिळविण्यात भाजपा ला यश आले आहे. तालुक्यात भाजपाला ५ जनसुराज्य ला २ अशा ७ जागा मिळाल्या आहेत. त्या खालोखाल प्रकाश आवाडे यांच्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी ने २ जागावर आपला हक्क दाखविला आहे. शिवसेनेने या निवडणुकी एक जागा जिंकून प्रस्थापितांना धक्का दिला आहे. तालुक्यात प्रथम च स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खाते उघडले आहे. स्वाभिमानीला 1 जागा मिळाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस, युवक क्रांती आघाडी, सहअपक्ष चा धुव्वा उडाला आहे. तालुक्यात रूकडी जिल्हा परिषद मतदारसंघात धक्कादायक निकाल लागला माजी खासदार निवेदिता माने यांच्या सूनबाई आणि जिल्हा परिषद चे सदस्य धैर्यशील माने यांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत. तर गतवेळी चार जागा जिंकणारी काँग्रेस या वेळी भुईसपाट झाली आहे. हातकणंगले तालुक्यातील 11 जिल्हा परिषद आणि 22 पंचायत समिती च्या निवडणुकीची मतमोजणी इचलकरंजी येथील राजीव गांधी सांस्कृतिक हॉल मध्ये सुरू झाली. तालुक्यात भाजपाने पाच तर मित्र पक्ष जनसुराज्यने दोन जागा जिंकून आघाडी घेतली आहे. त्या पाठोपाठ आवाडे ग्रुपमधील कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी ने एकटा चलो चा निर्णय घेऊन दोन जागा जिंकून काँग्रेस सह भाजपा ला हादरे दिले आहेत. शिवसेनेने आपली एकमेव जागा मिळवत तालुक्यात आपले बस्तान बसविले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मात्र तालुक्यात खाते उघडले आहे. तालुक्यात भाजप ने शिरोली, हातकणंगले, कोरोची, कबनूर, हुपरी या पाच जागा जिंकल्या आहेत. जनसुराज्य ने घुणकी आणि भादोले चे आपले गड कायम राखले आहेत. शिवसेनेने रेदाळ ची जागा गमावली असून त्या बदल्यात कुंभोज जिंकून आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. आवळे आणि आवाडे च्या वादात तालुक्यात काँग्रेस भुईसपाट झाली आहे. तर आवाडे यांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यात यश आले आहे. आवाडे याच्या कोल्हापूर जिल्हा ताराराणी आघाडी ने दोन जागा जिंकून काँग्रेस नेत्यांना चपराक दिली आहे.

Web Title: BJP's victory in Hatkanangle taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.