Kolhapur: पालकमंत्र्यांना दाखवणार होते काळे झेंडे; इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती पदाधिकाऱ्यांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 11:36 AM2024-09-12T11:36:58+5:302024-09-12T11:38:11+5:30

इचलकरंजी : शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना ताबडतोब राबवावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. ...

Black flags were to be shown to the Guardian Minister Hasan Mushrif Ichalkaranji Sulkood Water Scheme Action Committee officials arrested  | Kolhapur: पालकमंत्र्यांना दाखवणार होते काळे झेंडे; इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती पदाधिकाऱ्यांना अटक

Kolhapur: पालकमंत्र्यांना दाखवणार होते काळे झेंडे; इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समिती पदाधिकाऱ्यांना अटक

इचलकरंजी : शहरासाठी मंजूर असलेली सुळकुड पाणी योजना ताबडतोब राबवावी या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन दुर्लक्ष करत आहे. या संतापातून सुळकुड पाणी योजना कृती समितीच्यावतीने गुरुवारी इचलकरंजी दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात येणार होती. दरम्यान, आंदोलनाच्या पूर्वीच राष्ट्रवादीचे मदन कारंडे आणि लालबावट्याचे सदा मलाबादे या दोघांना पोलिसांनी अटक केली.
 
तसेच आंदोलनासाठी राजाराम स्टेडियम परिसरात जमलेल्या आंदोलकांना पोलिसांनी घेराव घालून ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी रक्तपाथाची भाषा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांचा धिकार असो, पाणी आमच्या हक्काचं, कोण म्हणते देत नाही, चले जाओ चले जाओ पालकमंत्री चले जाओ. अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. अटक करताना आंदोलक व पोलिसात किरकोळ झटापट झाली. 

दोन पोलीस व्हॅन मधून सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये काँग्रेसचे राहुल खंजिरे, स्वाभिमानीचे विकास चौगुले, नागरिक मंचेचे अभिजीत पटवा, शिवसेनेचे सयाजी चव्हाण आधीच विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांचा समावेश आहे.

Web Title: Black flags were to be shown to the Guardian Minister Hasan Mushrif Ichalkaranji Sulkood Water Scheme Action Committee officials arrested 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.