मराठा आरक्षणाच्या नियोजनासाठी घोंगडी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:19 AM2021-06-02T04:19:15+5:302021-06-02T04:19:15+5:30
सचिन भांदीगिरे, जयवंत गोरे, किशोर आबिटकर, मच्छिंद्र मुगडे, सुशांत माळवी, शरद मोरे, प्रवीणसिंह सावंत, बजरंग कुरळे, जयवंत गोरे यांनी ...
सचिन भांदीगिरे, जयवंत गोरे, किशोर आबिटकर, मच्छिंद्र मुगडे, सुशांत माळवी, शरद मोरे, प्रवीणसिंह सावंत, बजरंग कुरळे, जयवंत गोरे यांनी मराठा आरक्षणाचे महत्त्व आणि ते कोणत्या पद्धतीने मिळवावे लागेल, यासंदर्भात आपली आक्रमक भूमिका मांडली.
या बैठकीमध्ये एकमताने असे ठरवण्यात आले की, महाराष्ट्रातील तमाम मराठा आमदार व खासदारांनी रायगडवर येऊन छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी, त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी लढणारे एकमेव नेतृत्व छत्रपती संभाजीराजे यांचे हात मजबूत करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. राजे जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी समरस राहून इथून पुढे मराठा समाजाचे कार्य करत राहण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. या बैठकीला, रोहित तांबेकर, शरद मोरे, प्रकाश माणगावकर, आनंदा देसाई, सतीश जाधव, संग्रामसिंह पोफळे, नंदकुमार शिंदे, संदीप पाटील, शशिकांत वाघरे, गोंदा पाटील, प्रकाश वास्कर, नाथजी पाटील आदींसह सकल मराठा समाजाचे नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
फोटो ओळ
मराठा आरक्षण लढाईत संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी घोंगडी बैठकीत बोलताना सचिन भांदीगरे. सोबत प्रवीणसिंह सावंत, शरद मोरे, नंदकुमार शिंदे आदी.