केनवडे फाटा येथे शिवसेनेचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:56+5:302020-12-09T04:18:56+5:30
सकाळी दहा वाजता केनवडे फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात काळे झेंडे ...
सकाळी दहा वाजता केनवडे फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार केंद्र सरकारच्या कायद्यांविरोधात काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात जि. प. सदस्य, ‘गोकुळ’चे संचालक अंबरीश घाटगे, अन्नपूर्णा कारखान्याचे संचालक एम. बी. पाटील (सिद्धनेर्ली), सदाशिव पाटील (एकोंडी), अन्नपूर्णा पाणीपुरवठा संस्थेचे संचालक विश्वास पाटील (व्हनाळी), दत्ता दंडवते, आनंदा मगदूम (गोरंबे), सुरेश मर्दाने, शरद पाटील (व्हनाळी), आनंदा तळेकर (अध्यक्ष), धोंडिराम एकशिंगे, बाजीराव पाटील (केनवडे), कॅप्टन काशिनाथ जिरगे (आणूर), रणजित मूडुकशिवाले (मळगे बु ), अरुण पाटील (शंकरवाडी) उपस्थित होते.
०८ साके
फोटो ओळी : केंद्र सरकारच्या शेतीविषयक नव्या कायद्यांविरोधात केनवडे फाटा (ता. कागल) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.