कर्नाटकाकडे जाणारा ऊस रोखा--जिल्हाधिकाºयांचे पोलिसांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:58 AM2017-10-24T00:58:06+5:302017-10-24T01:03:00+5:30
कोल्हापूर : कर्नाटकमधील साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पाठविल्याने जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसाचा तुटवडा भासणार आहे, अशा तक्रारी
कोल्हापूर : कर्नाटकमधील साखर कारखान्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पाठविल्याने जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसाचा तुटवडा भासणार आहे, अशा तक्रारी आल्याने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सोमवारी पोलीस प्रशासनाला कोल्हापुरातून कर्नाटकाकडे जाणारा ऊस रोखण्याच्या सूचना दिल्या.
कर्नाटकात ऊस गळीत हंगाम महाराष्टÑापेक्षा लवकर सुरू होतो. त्यामुळे आपली शेतजमीन लवकर मोकळी व्हावी यासाठी कोल्हापूरसह सीमाभागातील शेतकºयांकडून कर्नाटकातील कारखान्यांना ऊस घातला जातो. सध्याही कर्नाटककडे मोठ्या प्रमाणात ऊस जात आहे. या संदर्भात काही तक्रारी जिल्हाधिकाºयांकडे आल्या असून, यामध्ये कर्नाटकला जर ऊस गेला तर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस अपुरा पडण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आमदार हसन मुश्रीफ तसेच वारणा उद्योग समुहाचे प्रमुख विनय कोरे यांनीही कर्नाटकात जाणारा ऊस रोखण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली होती. ऊसदर नियंत्रण समितीच्या बैठकीतही अन्य राज्यात ऊस पाठविण्यास निर्बंध घालण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुभेदार यांनी सोमवारी पोलीस अधीक्षकांना कर्नाटककडे जाणारी उसाची वाहने आडवा, अशा सूचना दिल्या.
ऊसदर बैठकीबाबत...
उसदरासंदर्भात साखर कारखानदार व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेण्यासंदर्भात अद्याप कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे अशी बैठक घेण्याचा सध्यातरी प्रश्नच नाही. ऊसदराचा सर्व निर्णय हा शासनस्तरावरील विषय आहे. त्यामुळे भविष्यात ऊस दरासंदर्भात स्थानिक पातळीवर बैठक घेण्याबाबत शासनाकडून काही सूचना आल्यास त्यादृष्टीने विचार केला जाईल, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले.
‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेनंतरच कारखानदार भूमिका स्पष्ट करणार
कोल्हापूर : आगामी हंगामातील पहिल्या उचलीबाबत चाचपणी करण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांची कोल्हापुरातील हॉटेलमध्ये सायंकाळी सुमारे तासभर बैठक झाली. त्यामध्ये साखरेचे दर, बँकांची उचल व वाढलेल्या एफआरपीवर प्रामुख्याने चर्चा झाली असली तरी ‘स्वाभिमानी’च्या ऊस परिषदेनंतरच भूमिका स्पष्ट करण्यावर एकमत झाल्याचे समजते.
कर्नाटकातील साखर हंगाम सुरू झाल्याने महाराष्ट्रातील विशेषत: सीमाभागातील कारखान्यांचा हंगाम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. राज्यातील हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत असला तरी यंदाही ऊस दराची कोंडी निर्माण होणार आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीस आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, ‘शाहू’चे अध्यक्ष समरजित घाटगे, माजी मंत्री विनय कोरे, प्रा.संजय मंडलिक, के. पी. पाटील, राहुल आवाडे, अशोक चराटी, पी. जी. मेढे, आदी या बैठकीस उपस्थित होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शनिवारी (दि. २८) जयसिंगपूर येथे ऊस परिषद आहे. त्यामध्ये खासदार शेट्टी पहिल्या उचलीची नेमकी किती मागणी करतात हे पाहूनच पुढील भूमिका घ्यावी तोपर्यंत कोणतीच चर्चा, वक्तव्य कुणी करू नये असे ठरल्याचे सांगण्यात आले.
तीन संघटना मैदानातयंदा तीन शेतकरी संघटना ऊसदराच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांची मागणी किती असू शकेल, वाढीव एफआरपी, साखरेला मिळत असलेला दर व राज्य बँकेने अद्याप उचलीबाबत निर्णय दिलेला नाही, त्यातच अद्याप परतीचा पाऊस असल्याने हंगाम कसा सुरू करायचा, याबाबत चर्चा झाली.