मराठा आरक्षणासाठी पन्हाळ्यात रास्ता रोको, वाहतुकीची कोंडी; परिक्षेसाठी केवळ विद्यार्थ्यांना सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 01:03 PM2023-11-01T13:03:29+5:302023-11-01T13:06:13+5:30

नितीन भगवान पन्हाळा : आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थ व मनोज जरांगे ...

Block the road to Panhala for reservation of Maratha community, leave only students for exams | मराठा आरक्षणासाठी पन्हाळ्यात रास्ता रोको, वाहतुकीची कोंडी; परिक्षेसाठी केवळ विद्यार्थ्यांना सोडलं

मराठा आरक्षणासाठी पन्हाळ्यात रास्ता रोको, वाहतुकीची कोंडी; परिक्षेसाठी केवळ विद्यार्थ्यांना सोडलं

नितीन भगवान

पन्हाळा : आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी पन्हाळ्यातील मराठा समाजाने आज, बुधवारी सकाळी जुन्या नाक्याजवळ रास्तारोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. शाळेच्या परीक्षा चालू असल्याने विद्यार्थ्यांची अडवणूक न केल्याने विद्यार्थी परीक्षेला वेळेत पोहचू शकले.

रास्तारोको आंदोलनाच्या ठिकाणी तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर दोन तास चाललेले रास्तारोको आंदोलन थांबवण्यात आले, नंतर तहसीलदार कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळीच रास्तारोको आंदोलन झाल्यामुळे सरकारी कर्मचारी व अन्य कर्मचारी कामावर पोहचू शकले नाहीत. तर शाळेच्या परीक्षा चालू असल्याने मुलांना अडवले नसल्याने ते वेळेत परीक्षेला पोहचू शकले. आंदोलनात महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी पन्हाळा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Block the road to Panhala for reservation of Maratha community, leave only students for exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.