कळे येथे ब्लँक पँथर पक्षातर्फ़े महिलांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 04:25 PM2020-11-09T16:25:12+5:302020-11-09T16:29:25+5:30
farmar, bachatgat, rasaroko, kolhapurnews, woman शेतकरी व उद्योजकांप्रमाणे महिला बचत गटांची कर्जे माफ करावीत या मागणीसाठी ब्लँक पँथर पक्षाच्या वतीने कळे ( ता. पन्हाळा ) येथील कोल्हापुर - गगनबावडा या महामार्गावर दस्तुरी चौकात सुमारे एक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कळे -कष्टकरी महिलांना गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी शेतकरी व उद्योजकांप्रमाणे महिला बचत गटांची कर्जे माफ करावीत या मागणीसाठी ब्लँक पँथर पक्षाच्या वतीने कळे ( ता. पन्हाळा ) येथील कोल्हापुर - गगनबावडा या महामार्गावर दस्तुरी चौकात सुमारे एक तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कोल्हापुर जिल्हयातुन शेकडो महिला उपस्थित होत्या. मागणीचे निवेदन कळे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले व कळेचे मंडल अधिकारी एस्.जी. ठाकरे यांच्याकडे देण्यात आले.
कोरोनामुळे कष्टकरी महिला संसार चालविताना मेटाकुटीस आल्या आहेत. त्यातच बचत गटाच्या माध्यमातुन मायक्रो फायनान्स कंपन्याकडुन घेतलेल्या कर्जाची परतफेड चक्रवाढ पध्दतीने व्याज आकारुन करण्यासाठी कंपन्या तगादा लावत आहेत. यामुळे या महिलांची दैनीय अवस्था झाली आहे.
यावेळी ब्लँक पँथरचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई , कोल्हापुर जिल्हा युवती उपाध्यक्ष प्रियांका सागर माने , पन्हाळा तालुका महिला अध्यक्षा गिता ज्ञानदेव येरुडकर , जिल्हा अध्यक्ष दयानंद कांबळे , जिल्हा निरीक्षक विश्वास कांबळे , यांनी मनोगत व्यक्त केले.
आंदोलनास कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष राम भाऊ कांबळे , श्वेता पोवार, सागर माने, धोंडीराम कांबळे , पुंडलीक नाईक ( खाटांगळे ) विष्णु दोनवडेकर , सरदार पाटील, सुवर्णा शेळके , दिनेश माने , दयानंद शिरोलीकर आदिंच्याबरोबरच ब्लँक पँथरचे अनेक कार्यकर्ते व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या.
- शेकडो महिलांनी एकत्र येऊन कळे विभागात रास्ता रोको करण्याची ही पहिलीच वेळ.
- महिलांच्याकडुन अगदी शिस्तबध्द आंदोलन
- सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा
- गोल रिंगण करुन "फायनान्स कंपन्यांची तत्काळ कर्ज वसुली थांबवा " " श्रीमंतांप्रमाणे गरीबांचीही कर्जे माफ करा " अशा घोषणा