वडगावात १४१ रक्तदात्यांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:24 AM2021-04-16T04:24:09+5:302021-04-16T04:24:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पेठवडगाव : येथे आमदार राजू आवळे यूथ फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. ...

Blood donation of 141 blood donors in Wadgaon | वडगावात १४१ रक्तदात्यांचे रक्तदान

वडगावात १४१ रक्तदात्यांचे रक्तदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पेठवडगाव : येथे आमदार राजू आवळे यूथ फौंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

शिबिरात १४१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी आमदार राजू आवळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कपिल पाटील यांनी स्वतः रक्तदान करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले. शिबिराचे आयोजन आवळे फौंडेशनचे अध्यक्ष राहुल माने यांनी केले होते.

येथील बिरदेव चौकातील बाळूमामा मंदिरात कोरोनाचे शासकीय नियम पाळत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त व कोरोनाच्या काळात रक्ताची गरज भासत आहे. त्यामुळे आमदार राजू आवळे फौंडेशन व विजयपूर ब्लॅड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आयोजित करण्यात आले होते. यावेळी १४१ हून अधिक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यामध्ये युवतींचाही समावेश होता.

प्रास्ताविकात फौंडेशनचे अध्यक्ष पै. राहुल माने म्हणाले, जिल्ह्यात रक्त टंचाई निर्माण होत आहेत. रक्तामुळे जीवदान देण्यासाठी व युवा पिढीने पुढे आले पाहिजे. विधायकतेतून समाज प्रबोधन करण्याचा उद्देश राजू आवळे फौंडेशनचा आहे. यापुढेही कार्यरत राहू.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष संभाजी माने, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, संतोष पुरोहित, सूरज जामदार, अभिजित माने, गणेश माने, उत्तम माने, विशाल सपाटे, दीपक माने, सौरभ गावडे, संजय माने, उमेश माने, सुशांत गावडे, सनी कोळी, रोहित माने, दीपक खरात, रोहित माने, कोमल माने आदी उपस्थित होते.

पेठवडगाव : येथील बिरदेव चौकात

आमदार राजू आवळे फौंडेशन व विजयपूर ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरात रक्तदान केलेल्यांना भेट वस्तू देताना आमदार राजू आवळे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कपिल पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, संयोजक पै. राहुल माने आदी उपस्थित होते. (छाया : सुहास जाधव)

Web Title: Blood donation of 141 blood donors in Wadgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.