कागल येथील शिबिरात १५४ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:25 AM2021-08-29T04:25:32+5:302021-08-29T04:25:32+5:30

येथील युवा उद्योजक आणि श्रीनाथ सहकार समूहाचे दिवंगत पदाधिकारी उमेश चंद्रकांत गवळी यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ...

Blood donation of 154 people in Kagal camp | कागल येथील शिबिरात १५४ जणांचे रक्तदान

कागल येथील शिबिरात १५४ जणांचे रक्तदान

Next

येथील युवा उद्योजक आणि श्रीनाथ सहकार समूहाचे दिवंगत पदाधिकारी उमेश चंद्रकांत गवळी यांच्या आठव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात १५४ जणांनी रक्तदान केले. यामध्ये बावीस महिलांचा समावेश होता.

येथील कै. उमेश गवळी सभागृहात आयोजित फोटो पूजन कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, प्रकाश गाडेकर, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील, शाहू साखरचे संचालक बाॅबी माने, नामदेवराव पाटील, युवराज पसारे, उपनगराध्यक्ष विवेक लोटे, रमेश माळी, नंदकुमार माळकर, मंडलिक साखर कारखान्याचे संचालक ईगल प्रभावळकर, अतुल जोशी, बाबासाहेब नाईक यांच्यासह शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. श्रीनाथ समूहाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गवळी, शिवाजी वाहनधारक पतसंस्थेचे अध्यक्ष महेश गवळी, जयसिंगराव कोकाटे, आनंदराव वास्कर, शिवाजी पाचगावे, गंगाराम शेवडे, सचिन मठकरी, प्रफुल्ल शहा आदी सदस्य आणि संचालक उपस्थित होते.

चौकट

● तीन लाखांची मदत..

श्रीनाथ समूह आणि गवळी परिवाराकडून या दिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख पंचाहत्तर हजार तर कागल शहरातील खासगी कोविड लसीकरण मोहिमेस एक लाख रुपये प्रदान करण्यात आले. हे दोन्ही धनादेश मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे चंद्रकांत गवळी यांनी सुपूर्द केले. तर शहरातील दोन मूकबधि, कर्णबधिर शाळा, एक अनाथालय यांना प्रत्येकी पाच हजार तर मातोश्री वृद्धाश्रमास अकरा हजार रुपये भोजनासाठी देण्यात आले.

फोटो कॅप्शन

कागल येथे श्रीनाथ समूहाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधी, कोविशिल्ड लसीकरणासाठी मदतीचा धनादेश मंत्री मुश्रीफ यांच्याकडे चंद्रकांत गवळी यांनी सुपूर्द केला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Blood donation of 154 people in Kagal camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.