शिवाजी विद्यापीठात ६१ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:39+5:302021-07-17T04:19:39+5:30

कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६१ जणांनी रक्तदान केले. ...

Blood donation of 61 people at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात ६१ जणांचे रक्तदान

शिवाजी विद्यापीठात ६१ जणांचे रक्तदान

Next

कोल्हापूर : ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठात शुक्रवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ६१ जणांनी रक्तदान केले. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षाने (एनएसएस) या शिबिराचे संयोजन केले.

विद्यापीठातील राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख प्रमुख उपस्थित होते. इव्हेंट ॲण्ड मार्केटिंग विभागाचे उपव्यवस्थापक दीपक मनाठकर यांनी ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमाची माहिती दिली. या शिबिरातील रक्तदाते समाधान बहेरे, मकरंद लव्हटे, सुरेश पाटील, आदींना कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. या वेळी विद्यापीठाच्या ‘एनएसएस’चे संचालक अभय जायभाये, कार्यक्रम अधिकारी अमोल कुलकर्णी, एस. एफ. बोथीकर, प्रभाकर माने, शिवाजी विद्यापीठ सेवक संघाचे अतुल एतावडेकर, शशिकांत साळोखे, सदानंद माने, राजेश चव्हाण, दीपक काशीद, सुरेखा आडके, वर्षा माने, विजय पाटील, अजय आयरेकर, संग्राम मोरे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया

कोरोनाच्या सद्यस्थितीची गरज लक्षात घेऊन ‘लोकमत’ने आयोजित केलेला महारक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे. रक्ताची गरज असणाऱ्या रुग्णांना या उपक्रमातून मोठी मदत झाली. सामाजिक उपक्रमात शिवाजी विद्यापीठ नेहमीच अग्रेसर असते. ‘लोकमत रक्ताचं नातं’ या उपक्रमात विद्यापीठ सहभागी झाले. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी या विद्यापीठाच्या घटकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.

-डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू

फोटो (१६०७२०२१-कोल-विद्यापीठ कॅम्प) : कोल्हापुरात गुरुवारी ‘लोकमत’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. या वेळी डावीकडून विद्यापीठ सेवक संघाचे सुरेश पाटील, अजय आयरेकर, अतुल एतावडेकर, ‘एनएसएस’चे संचालक अजय जायभाये, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी एस. एस. बोथीकर उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

फोटो (१६०७२०२१-कोल-विद्यापीठ कॅम्प ०१) : कोल्हापुरात गुरुवारी ‘लोकमत’ आणि शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते झाले. या वेळी डावीकडून विद्यापीठ सेवक संघाचे राजेंद्र खामकर, सुरेश पाटील, अजय आयरेकर, अतुल एतावडेकर, ‘एनएसएस’चे संचालक अजय जायभाये, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘एनएसएस’चे कार्यक्रम अधिकारी एस. एस. बोथीकर, ‘लोकमत’चे इव्हेंट ॲण्ड मार्केटिंग विभागाचे उपव्यवस्थापक दीपक मनाठकर, ‘एनएसएस’चे प्रकल्प अधिकारी संग्राम मोरे उपस्थित होते. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Blood donation of 61 people at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.