रक्तदान शिबिराने शिंदेंच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:58+5:302021-02-06T04:43:58+5:30

कोल्हापूर येथील सायबर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. ए. डी. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. ...

Blood donation camp to lighten the memories of Shinde | रक्तदान शिबिराने शिंदेंच्या स्मृतींना उजाळा

रक्तदान शिबिराने शिंदेंच्या स्मृतींना उजाळा

Next

कोल्हापूर येथील सायबर शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. ए. डी. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील डॉ. ए. डी. शिंदे इंजिनिअरिंग महाविद्यालयामध्ये श्रमदान व रक्तदान शिबिर घेऊन त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. अध्यक्षस्थानी डॉ. एम. एस. बेळगुद्री होते. नगराध्यक्षा स्वाती कोरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी नगराध्यक्षा कोरी, उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी डॉ. शिंदे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.

शिबिरांतर्गत गुड्डाई मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली. रक्तदान शिबिरामध्ये १३० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. महाविद्यालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास डॉ. सुभाष पाटील, डॉ. डी. एस. बाडकर, तेजस्विनी परीट, मेघा फुले, आय. टी. पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp to lighten the memories of Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.