‘लोकमत’तर्फे आजपासून महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:17 AM2021-07-02T04:17:42+5:302021-07-02T04:17:42+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या या कठीण काळात रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी व स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या ...
कोल्हापूर : कोरोनाच्या या कठीण काळात रुग्णांची रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी व स्वातंत्र्यसेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज, शुक्रवारपासून ‘लोकमत’च्या वतीने ‘नातं रक्ताचं, नातं जिव्हाळ्याचं’ या महारक्तदान शिबिराला प्रारंभ होत आहे. शाहू ब्लड बँक येथे सकाळी १०.३० वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व राजर्षी शाहू ब्लड सेंटरचे अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन होईल.
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील गावागावांत, तालुक्यांच्या ठिकाणी १५ तारखेपर्यंत चालणाऱ्या या अभियानाला लोकचळवळ बनविण्यासाठी चला, सक्रिय सहभाग घेऊन मोठ्या संख्येने रक्तदान करूया आणि ‘दातृत्वाचे कोल्हापूर’ या बिरुदावलीला रक्तदानाचा नवा आयाम देऊया... असे आवाहन ‘लोकमत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हटले जाते. एकमेकांशी परिचय नसलेल्या व्यक्तींमध्येही या रक्तदानामुळे नाते जोडले जाते. आपल्या या एका पावलाने एखाद्याचा जीव वाचू शकतो, ही भावनाच समाधान देणारी असते. ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी लोकमत समूहातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्ग सुरू झाल्याने रक्तदानावर मर्यादा आल्या. रक्तदानाचे प्रमाण घटल्याने थॅलेसीमियासारखे आजार असलेल्या रुग्णांना किंवा आपत्कालीन परिस्थितीतून जात असलेल्या रुग्णांना रक्ताची कमतरता भासू लागली. आजही परिस्थिती बदललेली नाही, अनेक ब्लड बँकांमध्ये रक्ताची कमतरता आहे.
या कठीण काळात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत ‘लोकमत’च्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ब्लड बँकांमधील रक्ताच्या पिशव्यांची कमतरता भरून निघणार आहेच; पण महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना जीवनदान मिळणार आहे.
---
अशी होतील रक्तदान शिबिरे
दिनांक : वेळ : ठिकाण
२ जुलै - १० ते ४ : राजर्षी शाहू ब्लड सेंटर, नागाळा पार्क, कोल्हापूर
३ जुलै : १० ते ४ : जीवनधारा ब्लड बँक, राजारामपुरी, कोल्हापूर
३ जुलै : ९ ते २ : एस. जे. फौंडेशन, त्र्यंबोली लॉन, लाईन बझार, कोल्हापूर
४ जुलै : ९ ते २ : कळंबा जेल, कारागृह अधिकारी-कर्मचारी निवासस्थान, कोल्हापूर
४ जुलै : ९ ते २ : मीनाबाई पोपटलालजी शहा हॉस्पिटल, मंगळवार पेठ, कोल्हापूर
४ जुलै : १० ते २ : स्वामी स्वरूपानंद हॉल, नवीन न्यायालय, बावडा रोड
४ जुलै : १० ते ४ : नगर परिषद सांस्कृतिक हॉल, एस. टी. स्टँडजवळ, पन्हाळा
५ जुलै : १० ते ३ : ताराराणी पक्ष कार्यालय, इचलकरंजी
५ जुलै : १० ते ३ : लायन्स क्लब हॉल, इचलकरंजी
६ जुलै : १० ते ४ : महात्मा फुले सूतगिरणी, वाठार, पेठवडगाव
७ जुलै : १० ते ४ : आबासाहेब भोगावकर हायस्कूलसमोर, बाजारभोगाव
८ जुलै : ९ ते २ : मुस्लीम बोर्डिंग हॉल, दसरा चौक, कोल्हापूर.
८ जुलै : १० ते ४ : महादेव मंदिर, सांगरूळ, ता. करवीर
९ जुलै : १० ते ४ : हनुमान दूध संस्था, गाडेगोंडवाडी (ता. करवीर)
९ जुलै : ९ ते १ : मध्यवर्ती प्रशासकीय, सांस्कृतिक हॉल, आजरा
१० जुलै : १० ते ४ : कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, कळे
११ जुलै : १० ते २ : गुरुनानक हॉल, गांधीनगर
११ जुलै १० ते ४ : मोरेवाडी ग्रामपंचायत हॉल
११ जुलै : १० ते ४ : देशमुख इंग्लिश मीडिअम हायस्कूल, साने गुरुजी वसाहत
११ जुलै : १० ते ४ : हनुमान मंदिर, कोतोली, ता. पन्हाळा
११ जुलै : १० ते ३ : चौंडेश्वरी मंदिर, सरुड, ता. शाहूवाडी
११ जुलै : ९ ते २ : मर्चंट्स असोसिएशन सभागृह, नववी गल्ली, जयसिंगपूर
१८ जुलै : ८ ते ५ : केंद्रीय शाळा, पाचगाव, ता. करवीर
---
सूचना : कंपोझिट लोगो वापरावा.
---