‘खाजगी प्राथमिक शिक्षक समिती’तर्फे उद्या रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:50+5:302021-07-16T04:17:50+5:30
या शिबिराचे संयोजन खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती आणि खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने केले आहे. कोरोनाच्या संकटात ...
या शिबिराचे संयोजन खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती आणि खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेने केले आहे. कोरोनाच्या संकटात आमच्या समिती आणि पतसंस्थेने सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोनाच्या स्थितीत राज्याची गरज ओळखून ‘लोकमत’ समूहाने आयोजित केलेला महारक्तदान शिबिराचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे. शिक्षक हा समाजभान जपणारा घटक आहे. रक्तदान करण्याच्या एका पावलाने एखाद्याचा जीव वाचू शकतो या भावनेतून शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन योगदान देणार असल्याचे खासगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी सांगितले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव डावरे, डॉ. श्रीधर सावंत विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक किरण खटावकर उपस्थित होते.
फोटो (१५०७२०२१-कोल-खाजगी शिक्षक समिती) : ‘लोकमत ’ आणि खासगी प्राथमिक शिक्षक समिती आणि पतसंस्थेने शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. त्यामध्ये शिक्षक, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले. यावेळी शेजारी डावीकडून महादेव डावरे, किरण खटावकर उपस्थित होते.
150721\15kol_2_15072021_5.jpg
फोटो (१५०७२०२१-कोल-खाजगी शिक्षक समिती) : ‘लोकमत ’ आणि खाजगी प्राथमिक शिक्षक समिती आणि पतसंस्थेने शनिवारी रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. त्यामध्ये शिक्षक, नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले. यावेळी शेजारी डावीकडून महादेव डावरे, किरण खटावकर उपस्थित होते.