चकोते ग्रुपकडून २५ शहरांत रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:26 AM2021-03-23T04:26:56+5:302021-03-23T04:26:56+5:30

जयसिंगपूर : कोरोना महामारीच्या विळख्यामुळे अनेक रुग्णालये तसेच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ...

Blood donation camps in 25 cities by Chakote Group | चकोते ग्रुपकडून २५ शहरांत रक्तदान शिबिर

चकोते ग्रुपकडून २५ शहरांत रक्तदान शिबिर

Next

जयसिंगपूर : कोरोना महामारीच्या विळख्यामुळे अनेक रुग्णालये तसेच रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई भासत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानासाठी शासनस्तरावर आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत चकोते ग्रुप व गणेश बेकरीचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांनी बुधवारी (दि. २४) वाढदिवसाचे औचित्य साधून महारक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. नांदणीबरोबरच पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक येथील २५ विविध शहरांमध्ये एकाच दिवशी हे शिबिर होणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात व्हेंटिलेटर इतकेच रक्ताची आवश्यकता असतानाही त्याची कमतरता असणे ही चिंताजनक बाब आहे. त्याचे गांभीर्य ओळखून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून महारक्तदान शिबिराचा संकल्प केला असल्याचे चकोते यांनी सांगितले.

समाजातील अडचणी ओळखून विविध सामाजिक उपक्रमातून चकोते ग्रुपने नेहमीच एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यामुळेच चकोते ग्रुपने राबविलेल्या ३५० बसस्थानक स्वच्छता अभियानाची नोंददेखील लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद आहे.

----------------------

चौकट -

वाढदिवस आणि सामाजिक उपक्रम

चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज व गणेश बेकरी नांदणीचे संस्थापक अध्यक्ष आण्णासाहेब चकोते यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व त्यांचे संगोपन केले जाते. गेली पंधरा वर्षे रक्तदान शिबिर, गतिमंद मुलांना दत्तक घेणे, पूरग्रस्तांना मदत, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, दुष्काळग्रस्त डफळापूर दत्तक घेऊन चारा व पाणी वाटप, स्वच्छता अभियान, नवजीवन नगर वाचनालयाची स्थापना, एबीसी स्कूलची निर्मिती अशा अनेक सामाजिक उपक्रमांतून आदर्श समाजकार्य केले आहे.

कोट - चकोते ग्रुपने नेहमीच विधायक उपक्रम राबविले आहेत. रक्ताची गरज ओळखून २५ शहरामध्ये दिवसभर हे शिबिर सुरू राहणार आहे. शिबिरामध्ये स्वयंस्फूर्तीने सामाजिक संस्था, वितरक, विक्रेते यांच्यासह रक्तदात्यांनी रक्तदान करावे.

- आण्णासाहेब चकोते, अध्यक्ष, चकोते ग्रुप

फोटो - २२०३२०२१-जेएवाय-०६-आण्णासाहेब चकोते

Web Title: Blood donation camps in 25 cities by Chakote Group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.