रिपब्लिकन पक्षातर्फे रांग लावून रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:29+5:302021-07-16T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद म्हणून गुरुवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रांग ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) ‘लोकमत’च्या आवाहनास प्रतिसाद म्हणून गुरुवारी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात रांग लावून कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. येथील
कावळा नाक्यावरील अक्षता मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. शिबिरात ५९ रक्त पिशव्या संकलित झाल्या.
‘लोकमत’च्या रक्तदान या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विविध संस्था, संघटना, समाजघटक, राजकीय पक्ष स्वत:हून पुढाकार घेत आहेत. असाच पुढाकार आठवले गटातर्फे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे यांनी घेतला. त्यांनी आवाहन करताच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रक्तदानासाठी मोठी गर्दी केली. गळ्यात निळा स्कार्फ घालून आलेल्या कार्यकर्त्यांमुळे मेळाव्यास व्हावी अशी गर्दी उसळली. शिबिराचे उद्घाटन ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील, मनुष्यबळ व्यवस्थापक संतोष साखरे, उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, गुणवंत नागटिळे, बी. के. कांबळे, मंगळराव माळगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या कार्यकर्त्यांनी शिस्तबध्दरित्या रक्तदान केले. त्यामध्ये महिलांचाही सहभाग उस्फूर्त होता. शुभम गायकवाड, सनी कांबळे, शाम सदामते, शुभम बुदिहाळकर, सूरज कांबळे, नितीन कांबळे, आकाश कांबळे आदी रक्तदात्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमास कुमार कांबळे, दत्ता मिसाळ, सुखदेव बुदिहाळकर, दीपक कांबळे, राहुल कांबळे, प्रदीप मस्के, अविनाश शिंदे, बाबासाहेब कागलकर, अविनाश अंबपकर, राजेंद्र ठिपुर्लीकर, बाळासाहेब वाशीकर आदी उपस्थित होते.
कोट
कोरोनामध्ये रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’ने रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला, हे अतिशय कौतुकास्पद आहे. या कामाला बळ म्हणून आम्हीही हे शिबिर घेतले.
उत्तम कांबळे,
जिल्हा अध्यक्ष, रिपब्लिकन पक्ष
कोट
आता सर्वत्र रक्ताची गरज आहे. यासाठीच ‘लोकमत’तर्फे महाराष्ट्रभर रक्तदान शिबिरांचे आयोजन करून अनेकांचे प्राण वाचविण्याचे काम केले आहे.
प्रा. शहाजी कांबळे,
अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र, रिपब्लिकन पक्ष