‘हॉटेल बंद’च्या निषेधार्थ कामगारांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:36+5:302021-04-08T04:23:36+5:30

बिंदू चौक येथील हॉटेल कामगार संघटनेच्या कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे, धीरज कठारे, ...

Blood donation by workers in protest of 'Hotel Closure' | ‘हॉटेल बंद’च्या निषेधार्थ कामगारांचे रक्तदान

‘हॉटेल बंद’च्या निषेधार्थ कामगारांचे रक्तदान

Next

बिंदू चौक येथील हॉटेल कामगार संघटनेच्या कार्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्यामध्ये संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे, धीरज कठारे, सुशांत पोवार, राहुल गोते, नितेश केसरकर, अनिल कांबळे , आनंदा कांबळे, शरद पाटील, विजय परीट, संतोष वंदुरे, योगेश गुंडलकर, विष्णू शेळके, अजित लटके, पुरुषोत्तम कुलकर्णी, नीतेश खेतल, नीलेश कांबळे, प्रवीण बागडी, विठ्ठल झोरे, मनोज भुरके, राजेंद्र पाटील, बबन पाटोळे, रोहित माने, रमेश पोवार, आदी सहभागी झाले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाचा हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. यामुळे राज्यातील लाखो हॉटेल कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर संकट कोसळणार आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळे या कामगारांना दहा महिन्यांचा पगार मिळाला नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा वापर करत हॉटेल चालू ठेवण्याची परवानगी द्यावी. हॉटेल मालकांसमवेत कामगार संघटनेची बैठक घ्यावी. कोरोना काळात प्रत्येक हॉटेल कामगारास मासिक वीस हजार रुपये आर्थिक मदत द्यावी. या मागण्यांबाबत शासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल, असा इशारा संघटनेचे राज्य संघटक गिरीश फोंडे यांनी दिला.

फोटो (०७०४२०२१-कोल-रक्तदान आंदोलन ०१ व ०२) : कोल्हापुरात बुधवारी हॉटेल कामगार संघटनेच्यावतीने रक्तदान करून लॉकडाऊनमधील हॉटेल बंदच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

===Photopath===

070421\07kol_1_07042021_5.jpg~070421\07kol_2_07042021_5.jpg

===Caption===

फोटो (०७०४२०२१-कोल-रक्तदान आंदोलन ०१ व ०२) : कोल्हापुरात बुधवारी हॉटेल कामगार संघटनेच्यावतीने रक्तदान करून लॉकडाऊनमधील हॉटेल बंदच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.~फोटो (०७०४२०२१-कोल-रक्तदान आंदोलन ०१ व ०२) : कोल्हापुरात बुधवारी हॉटेल कामगार संघटनेच्यावतीने रक्तदान करून लॉकडाऊनमधील हॉटेल बंदच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

Web Title: Blood donation by workers in protest of 'Hotel Closure'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.