केआयटी कॉलेजने जोडलं रक्ताचं नातं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:19+5:302021-07-16T04:17:19+5:30

या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनसीसी) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागातर्फे सेमिनार हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन ...

Blood relationship added by KIT College | केआयटी कॉलेजने जोडलं रक्ताचं नातं

केआयटी कॉलेजने जोडलं रक्ताचं नातं

googlenewsNext

या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनसीसी) आणि राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागातर्फे सेमिनार हॉलमध्ये आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील, उपाध्यक्ष सुनील कुलकर्णी, सचिव दीपक चौगुले, संचालक डॉ. विलास कार्जिन्नी आणि ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. इव्हेंट ॲण्ड मार्केटिंग विभागाचे उपव्यवस्थापक दीपक मनाठकर यांनी ‘लोकमत रक्ताचं नातं’या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ‘केआयटी’चे एनसीसी कार्यक्रम अधिकारी अमित वैद्य, अरूण देसाई, एनसीसी अधिकारी अमर काटकर, शारीरिक शिक्षण संचालक विजय रोकडे, भांडारपाल आर. टी. शिंदे, आदी उपस्थित होते. प्रा. प्रमोद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया

सामाजिक उपक्रमांमध्ये केआयटी नेहमीच अग्रेसर आहे. कोविड काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. ‘लोकमत रक्ताचं नातं’ उपक्रमात योगदान देत केआयटी परिवाराने माणुसकीचे आणि समाजाशी असलेले नाते दृढ केले आहे.

-डॉ. विलास कार्जिन्नी.

फोटो (१५०७२०२१-कोल-केआयटी कॉलेज फोटो) : कोल्हापुरात गुरुवारी ‘लोकमत’ आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील आणि ‘लोकमत’ चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून आर. टी. शिंदे, अरूण देसाई, अमर काटकर, विलास कार्जिन्नी, दीपक चौगुले, सुनील कुलकर्णी, दीपक मनाठकर, विजय रोकडे उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

150721\15kol_1_15072021_5.jpg

फोटो (१५०७२०२१-कोल-केआयटी कॉलेज फोटो) : कोल्हापुरात गुरूवारी ‘लोकमत ’ आणि केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे उदघाटन ‘केआयटी’चे अध्यक्ष भरत पाटील आणि ‘लोकमत’ चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून आर. टी. शिंदे, अरूण देसाई, अमर काटकर, विलास कार्जिन्नी, दिपक चौगुले, सुनिल कुलकर्णी, दिपक मनाठकर, विजय रोकडे उपस्थित होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)

Web Title: Blood relationship added by KIT College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.