गडहिंग्लज येथे महिलेचा खून

By admin | Published: July 31, 2016 12:56 AM2016-07-31T00:56:16+5:302016-07-31T00:56:16+5:30

पती फरार : अनैतिक संबंधातून घटनेची शक्यता

The blood of a woman at Gadhinglaj | गडहिंग्लज येथे महिलेचा खून

गडहिंग्लज येथे महिलेचा खून

Next

गडहिंग्लज : येथील आझाद रोडवरील देशपांडे हॉस्पिटलसमोर बाथरूममध्येच तीक्ष्ण हत्याराने सहा ते सात वार करून पतीने पत्नीचा खून केला. मंगल चंद्रकांत राऊत (वय ४२, मूळ गाव - मांगनूर, ता. कागल) असे महिलेचे नाव असून तिचा पती चंद्रकांत दत्तात्रय राऊत हा फरार आहे. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत राऊत हे आपल्या पत्नी आणि मुलांसह आझाद रोडवरील प्रमोद जाधव यांच्या घरात भाड्याने राहतात. चंद्रकांत येथील न्यू इंडिया इन्शुरन्समध्ये शिपाई म्हणून काम करतात. त्यांच्या एका मुलीचा (प्रियांका)विवाह झाला असून एक मुलगा (अवधूत) शिक्षणासाठी इचलकरंजी येथे राहतो. त्यांची दुसरी मुलगी पूजा ही येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असून ती सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली. चंद्रकांतने मंगलवर बाथरूममध्ये कोयत्यासारख्या हत्याराने सहा ते सात वार केले आहेत. मानेवर, हातावर, दोन्ही मांड्यांवर तसेच पाठीवरही वार झालेत. त्यात मंगलचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घराला कुलूप लावून चंद्रकांत निघून गेला. दरम्यान, मंगलच्या जोरात किंचाळण्याच्या आवाजामुळे शेजारी राहण्याऱ्या विवेक मुळे यांना शंका आल्याने त्यांनी वर जाऊन पाहिले असता दाराला कुलूप असूनही बाथरूममधील पाण्याचा नळ ठिपकत असल्याचे जाणवले. मुळे यांनी त्वरित पूजाला कॉलेजमधून बोलावून आणून दार उघडून पाहिले असता बाथरूममध्ये मंगलचा अर्धनग्न अवस्थेतील रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. पोलिस उपअधीक्षक डॉ. सागर पाटील, निरीक्षक औदुंबर पाटील आदींनी तातडीने घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आला.
विवेक मुळे यांच्या फिर्यादीवरून चंद्रकांत याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला असून त्याच्या शोधासाठी इचलकरंजीसह अन्य ठिकाणी पोलिस पथके रवाना झाली आहेत. (वार्ताहर)
चंद्रकांतचा साधेपणा अन् खुनाची निर्घृणता
चंद्रकांतच्या या कृत्याविषयी त्याच्या नातेवाइकांना विश्वासच बसत नव्हता. फारसा कुणात न मिसळणारा, अबोल, शांत अशीच त्याच्याविषयी भावना आहे; पण त्याने मंगलवर निर्घृणपणे वार का केले? त्याला इतका टोकाचा राग येण्याचे कारण काय? यामागे अनैतिक संबंधाचे कारण असू शकेल काय? या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत.
मोबाईल आढळला घरातच
चंद्रकांतने मंगलची हत्या केल्यानंतर दाराला कुलूप लावून पलायन केले, पण ज्या कोयत्यासारख्या धारदार हत्याराने त्याने वार केले ते हत्यार घटनास्थळी आढळले नाही, पण त्याचा मोबाईल मात्र पोलिसांना घरातच आढळला.

Web Title: The blood of a woman at Gadhinglaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.