मास्क नसलेल्यांवर कारवाईचा धडका; पाच लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:18 AM2020-12-09T04:18:36+5:302020-12-09T04:18:36+5:30
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच रात्री नऊनंतर आस्थापना ...
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे तसेच रात्री नऊनंतर आस्थापना सुरू न ठेवणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल गेल्या आठवड्यात म्हणजे दि. २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत महानगरपालिका, केएमटी आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाकडून ही कारवाई केली. रोज विविध भागांत ही पथके तैनात करण्यात आली आहेत.
केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, हा उद्देश असल्याचेही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.
शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कोरोना कमी झाला असला तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन करुन बलकवडे यांनी केले आहे.